Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीयेवल्यात मराठा आरक्षण जाहीर होताच शिवसेना व सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष

येवल्यात मराठा आरक्षण जाहीर होताच शिवसेना व सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष

मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाने जोरदार घोषणाबाजी

येवला प्रतिनिधी – तालुक्यामध्ये शिवसेना व सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल मोठा जल्लोष साजरा करण्यात आला शहरातील विंचूर चौफुली येथे शेकडो समाज बांधव व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हा विजय चा जल्लोष साजरा करण्यात आला. याच तालुक्यामधील मराठा आरक्षणाचा सर्वाधिक मोठा लढा उभा राहिला होता त्यामुळे महाराष्ट्राचे विशेष लक्ष येवला तालुक्यावरती होते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये देखील अनेकदा येवला तालुक्याचा उल्लेख होताना आपण बघितला आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या मतदारसंघ असल्यामुळे येवला तालुक्यातील मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे महत्त्व होते. त्यामुळे या तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठे आंदोलन देखील झाले आहे.

सकाळी नऊ वाजेच्या सुमारास विंचूर चौफुली येथे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी एकच गर्दी केली सुरुवातीला मनोज तरंगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत डीजेच्या तालावर ती पुरुष महिला व तरुण मंडळी यांनी चांगलाच ठेका धरला होता. त्यामुळे परिसरामध्ये मोठे वातावरण तयार झाले होते. या जल्लोषाच्या उपस्थितांनी प्रामाणिकपणे यांनी लढा उभारला असे मनोज जारंगे पाटील व त्या लढ्याला राजकीय वळण न देता एक काम करणारा मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी या लढ्याला यश दिले असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले.

या जल्लोषाच्या वेळी उपस्थित असलेले येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके पाटील, ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे शहर प्रमुख अतुल घाटे,अमोल सोनवणे, संतोष वल्टे, प्रा.प्रवीण निकम,युवराज पाटोळे, राजेंद्र गायकवाड,मनोज गायकवाड,राजू आहेर,तात्या पाटोळे,महेश लासुरे विष्णू पवार राजेंद्र जाधव, विष्णू जाधव,महिला आघाडीच्या सुमित्रा बोठे, बबीता कोल्हे, जोती माळी,प्रिया वर्पे,सुनीता लहरे,गणेश मोरे,प्रवीण खैरणार, रामकृष्ण खोकले, शैलेश करपे, लकी गायखे,किसान बोठे मंदाताई रोठे सुभाष रोठे.यांच्यासह आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मनोज जारंगे पाटील यांनी प्रामाणिकपणे उभा केलेल्या मराठ्यांच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहेत हे यश मराठा समाजातील प्रत्येक बांधवांना समर्पित केल्या जात आहे. अनेक राज्यकर्ते होऊन गेले पण कुणाची हिंमत झाली नाही ते काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले त्यामुळे मराठा समाज त्यांना कधीच विसरणार नाही.”
-पांडुरंग शेळके पाटील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -