Saturday, May 18, 2024
HomeदेशArvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना EDने केली अटक

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना EDने केली अटक

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना केंद्रीय तपास विभाग ईडीने दारू घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. ईडीने केजरीवाल यांची तब्बल दोन तास चौकशी केली आणि यानंतर त्यांची टीम त्यांना घेऊन ईडी कार्यालयात पोहोचली.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे पहिले प्रकरण आहे जेव्हा मुख्यमंत्री असताना एखाद्या नेत्याला केंद्रीय तपास विभागाने अटक केली आहे.

आपने स्पष्ट केले की अटकेनंतरही केजरीवाल आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. सोबतच पक्षानेही या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपने म्हटले की निवडणुकीमुळे ही अटक झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका बसल्यानंतर ईडीची टीम गुरूवारी संध्याकाळी सात वाजता केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचली. या दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

राजीनामा देणार नाहीत केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाने स्पष्ट केले की केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील.मंत्री आतिशी म्हणाल्या की केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. त्यांनी सांगितले की अरविंद केजरीवाल एक विचार आहे त्यांना संपवले जाऊ शकत नाही.

या प्रकरणात ईडीची ही चौथी मोठी कारवाई आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आधी ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. नुकत्याच ईडीच्या टीमने या संबंधित प्रकरणात बीआरएसचे नेता कविता यांना अटक केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -