Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीदिल्लीत पुन्हा श्रद्धासारखे हत्याकांड; फ्रिजमध्ये आढळला मुलीचा मृतदेह!

दिल्लीत पुन्हा श्रद्धासारखे हत्याकांड; फ्रिजमध्ये आढळला मुलीचा मृतदेह!

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असतानाच पुन्हा एकदा श्रद्धासारखेच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीमध्ये समोर आले आहे. श्रद्धाप्रमाणेच एका मुलीचा मृतदेह हा धाब्याच्या फ्रीजमध्ये आढळून आला असून या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.

साहिल गहलोत (वय २६) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करून पोलिसानी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाची दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीची हत्या केल्यानंतर मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. कश्मीरी गेट आयएसबीटीजवळ कारमध्ये मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -