Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वअमिताभ बच्चन व भारतीय क्रिकेटपटू

अमिताभ बच्चन व भारतीय क्रिकेटपटू

  • अर्थसल्ला: महेश मलुष्टे, चार्टर्ड अकाऊंटंट

आरबीआय केहेता है… जानकार बनिये सतर्क राहिये!’ ची जाहिरात करताना आपण अनेकदा पेपर आणि टेलिव्हिजनवर पहिले असेल. आजच्या लेखात, मी ‘आरबीआय’च्या काही मार्गदशक सूचना आणि बँकिंग लोकपाल (Banking Ombudsman) यावर आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे.

‘आरबीआय’च्या नियमावलीनुसार, तुम्हाला तुमच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवायची नसल्यास आपण मूलभूत बचत बँक ठेव खाते (बीएसबीडी) उघडू शकता. मूलभूत बचत बँक ठेव खाते हे कोणत्याही व्यक्तीला त्याचे वय किंवा उत्पन्न विचारात न घेता उघडता येते. तसेच हे खाते कोणत्याही प्रारंभिक ठेवीशिवाय उघडता येते. ग्राहकाच्या विनंतीनुसार नियमित बचत बँक खाते बीएसबीडी खात्यात रूपांतरित केले जाऊ शकते. बीएसबीडी खातेधारकांना ‘एटीएम-कम-डेबिट कार्ड’सारख्या मूलभूत बँकिंग सुविधा मोफत दिल्या जातात. ‘बीएसबीडी’ खात्यात ठेवींच्या संख्येवर मर्यादा नाही. परंतु ‘बीएसबीडी’ खातेधारकांचे त्याच बँकेत नियमित बचत खाते असू शकत नाही.
फसवणुकीपासून वाण्यासाठी, बँकिंग व्यवहारांच्या त्वरित सूचना मिळव्यात, त्या करीता तत्काळ अलर्टसाठी तुमचा ई-मेल आणि मोबाईल नंबर तुमच्या बँकेत नोंदविलेला असला पाहिजे. तसेच पासवर्ड, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही, कार्ड तपशील कोणाशीही शेअर करू नका. एखादा फसवा व्यवहार आपल्या खात्यातून झाला, तर आपल्या बँकेला ताबडतोब कळवा. जर तुम्ही तुमचे पेमेंट तपशील शेअर केले नसाल आणि बँकेला ३ दिवसांच्या आत कळवले असाल तर तुमचे नुकसान होण्यापासून वाचू शकता.

मोठ्या रकमेचे आश्वासन देणारे ईमेल, कॉल आणि संदेश हे बनावट असतात. त्याला बळी पडू नका. आरबीआयच्या नावाने एसएमएस, फोन, ईमेल, आरबीआयचे अधिकारी / किंवा तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे असे सांगणाऱ्या किंवा मोठ्या रकमेचे आश्वासन देणाऱ्या फोन कॉल, इमेलला बळी पडू नका. तुमचे बँक खाते तपशील, इंटरनेट बँकिंग वापरकर्ता आयडी, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, पिन किंवा ओटीपी कोणालाही सांगू नका. आरबीआय किंवा तुमची बँक हे कधीही मागत नाही याची सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. परदेशातून किंवा भारतातून स्वस्त निधीच्या ऑफर मिळाल्यास तुम्ही स्थानिक पोलीस, सायबर-क्राइम प्राधिकरण किंवा sachet@rbi.org.in वर तक्रार नोंदवू शकता.परदेशातून किंवा भारतातून स्वस्त निधीच्या उच्च आणि जलद परतावा योजना ह्या धोकादायक असू शकतात. आपले पैसे हुशारीने गुंतवा. योजना सांगणाऱ्या घटकाची पार्श्वभूमी तपासा. नियम आणि अटी नीट वाचा. बेकायदेशीरपणे पैसे स्वीकारणाऱ्या किंवा ठेवींच्या परतफेडीत चूक करणाऱ्या संस्थांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी www.sachet.rbi.org.in ला भेट द्या. किंवा स्थानिक पोलिस, सायबर-क्राइम प्राधिकरण किंवा sachet@rbi.org.in वर तक्रार नोंदवा.

पैसे पाठवण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागतो, पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नसते, तसेच पैसे मिळवण्यासाठी पिन/ओटीपी टाकणे आवश्यक नसते. तुम्हाला आणखी स्पष्टीकरण हवे असल्यास, कृपया आर. बी. आयला rbikehtahai@rbi.org.in ईमेल लिहावे.
आरबीआयने बँकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकिंग सोयीस्कर बनवण्यास सांगितले आहे, त्याकरिता तुमचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही तुमच्या घरी काही मूलभूत बँकिंग सुविधा मिळवू शकता. बँकांना त्यांच्या शाखांमध्ये समर्पित काउंटर उपलब्ध करून द्यावे लागतात जेथे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँकिंग गरजांसाठी प्राधान्य मिळते. तसेच आरबीआयने दृष्टिहीन व्यक्तींना चलनी नोटेचे मूल्य ओळखू यावे या करीता ‘मनी अॅप’ तयार केले आहे. एका महिन्याच्या आत बँकेने तुमच्या तक्रारीचे निराकरण न केल्यास, ‘आरबीआय’च्या बँकिंग लोकपालाशी (Banking Ombudsman) संपर्क साधावा. बँकिंग लोकपाल या सुविधेचा लाभ आपण विनामूल्य घेऊ शकतो. तुमच्या बँक/ NBFC/ ई-वॉलेटने ३० दिवसांपर्यंत प्रतिसाद दिलेला नाही किंवा मिळालेल्या उत्तराने समाधानी नसाल तर https://cms.rbi.org.in या संकेत संस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता किंवा crpc@rbi.org.in या इमेलवर तक्रार लिहू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -