Tuesday, May 21, 2024
Homeदेशएलआयसीनंतर आता ईपीएफओची गुंतवणुकही वादात!

एलआयसीनंतर आता ईपीएफओची गुंतवणुकही वादात!

कर्मचा-यांच्या कष्टाचा पैसा गुंतवलाय अदानी समूहात

मुंबई : हिंडेनबर्ग अहवालानंतर अनेकांनी अदानी समूहात गुंतवणुक करणे टाळलेले असताना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) मात्र कर्मचा-यांच्या कष्टाचा पैसा अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये गुंतवल्याची माहिती आता उघडकीस आली आहे.

सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर आता ईपीएफओच्या बोर्ड सदस्यांची आज एक बैठक होणार असून या बैठकीत गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये ईपीएफओची गुंतवणूक चालू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार कर्मचा-यांची ईपीएफओमध्ये जमा केलेली रक्कम निफ्टी५० द्वारे शेअर्समध्ये गुंतवली जाते. त्यात अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्ससारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

या वर्षी २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल समोर आल्यापासून अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अनेक बड्या गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे टाळले. मात्र त्यानंतरही एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनमध्ये टाकलेल्या कामगारांच्या पैशाचा मोठा हिस्सा अदानी समूहाच्या दोन कंपन्यांमध्ये गुंतवला. गौतम अदानी यांच्या समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्सची नावे यामध्ये समाविष्ट आहेत.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओकडे संघटीत क्षेत्रातील सुमारे २८ टक्के गुंतवणूकदारांच्या ठेवी आहेत. ईपीएफओ आपला निधी निफ्टी फिफ्टी एक्सचेंजशी जोडलेल्या ईटीएफ मध्ये गुंतवते. दर महिन्याला कर्मचा-यांच्या पगारातून कापून घेतलेल्या आणि कर्मचा-यांच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेचा मोठा भाग कर्मचा-यांच्या माहितीशिवाय किंवा मंजूरीशिवाय अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवला जात आहे.

गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यासाठी ईपीएफओ निफ्टी५० आणि सेन्सेक्स इंडेक्समध्ये गुंतवणूक करते. ईपीएफओ ग्राहकांच्या परवानगीशिवाय किंवा पर्यायी गुंतवणुकीच्या मार्गांशिवाय निफ्टी५० शेअर्समध्ये समाविष्ट असलेल्या अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये गुंतवणूक करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -