Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीAdani Electricity Price Hike : वीज ग्राहकांना उन्हाच्या चटक्यासोबत बसणार महावितरणाचा शॉक!

Adani Electricity Price Hike : वीज ग्राहकांना उन्हाच्या चटक्यासोबत बसणार महावितरणाचा शॉक!

‘इतक्या’ रुपयांची वीज दरवाढ

मुंबई : गेल्या महिनाभरापासून मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून येत्या काही दिवसांत हे तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याच वेळी घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. अशातच अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका वीज ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाच्या चटक्यांसोबत वाढत्या वीज बिलाचा शॉक बसणार आहे.

अदानी कंपनीने गतवर्षी झालेल्या इंधन खर्चातील ३१८ कोटी ३८ लाख रुपयांची वाढ वसूल करण्यासाठी राज्य ऊर्जा नियामक आयोगाकडे आदरपूर्वक प्रस्ताव सादर केला होता. याबाबत आयोगाने सोमवारी मान्यता दिली. ही रक्कम इंधन अधिभारातून मे ते २४ या काळात ग्राहकांकडून वसूल केली जाईल. या वाढत्या वीजेचा फटका तब्बल ३० लाख वीज ग्राहकांना बसणार आहे. तर वाणिज्य, औद्योगिक आणि इतर ग्राहकांसाठी, इंधन अधिभार वापरानुसार निर्धारित केला जाईल.

अशी असणार वीज दरवाढ

  • मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे.
  • ०-१००युनिट वीज वापर असणाऱ्या निवासी ग्राहकांकडून प्रति युनिट ७० पैसे
  • १०१-३०० युनिटसाठी १.१० रुपये
  • ३०१-५०० युनिटसाठी १.५ रुपये
  • ५०० हून अधिक वीज वापरासाठी १.७० रुपये इंधन अधिभार आकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सर्वात महागडी वीज

दक्षिणेकडील राज्यांमध्ये काही महिन्यांपूर्वीच वीजदरवाढ करण्यात आली. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्येही असाच निर्णय घेण्यात आला होता. पण महाराष्ट्राचा विचार केला तर वीजदरवाढ करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र हे सर्वात महागडी वीज मिळणारं राज्य ठरलं आहे. आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजेचा दर जास्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -