Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीअभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण

अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेलाही कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरात राहुनच मी सध्या उपचार घेतेय, असं नेहाने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नेहाला मागच्या काही दिवसांपासून सौम्य लक्षणं असल्यामुळे तिने आपली चाचणी करून घेतली. दोनदा तिची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तिसऱ्यांदा चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. नेहा घरात राहूनच उपचार घेत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -