अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Share

मुंबई : टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे २३ मे रोजी (काल) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

‘अनुपमा’ या प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्याच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

लेखक सिद्धार्थ नागर यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. सिद्धार्थ नगर यांनी म्हटले आहे की, एका कार्यक्रमातून परतत असताना त्यांना नितीश पांडे यांच्या निधनाची बातमी मिळाली. नितीश शूटिंगसाठी इगतपूरला गेले होते. त्या ठिकाणी रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, मृतदेह केव्हा आणण्यात आला आणि अंत्यसंस्कार केव्हा होणार याबाबत त्यांना फारशी माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नितेश यांचे पहिले लग्न अश्विनी काळसेकरशी झाले होते तर दुसरे मुरली शर्माशी झाले आहे. नितेश ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुखच्या असिस्टंटची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जात होते. नितेशने अनेक ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’ आणि टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ते सध्या ‘इंडियावाली माँ’, ‘अनुपमा’मध्ये काम करत होते.

Recent Posts

राणेंच्या झंझावाताने उबाठा सेनेला कापरे…

कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मंगळवारी ७ मे रोजी मतदान आहे. गेले दीड महिना भाजपाचे उमेदवार…

3 hours ago

नारायण राणे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत!

अरुण बेतकेकर (माजी सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, संलग्न शिवसेना) अठराव्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांना निवडण्यासाठी,…

3 hours ago

अमेरिकेतील कँपस विद्यार्थी रस्त्यावर

विश्वरंग: उमेश कुलकर्णी काही देशांत विद्यार्थी चळवळींनी देशातील राजकारण बदलून टाकले आहे. विद्यार्थी रस्त्यावर उतरले,…

4 hours ago

KKR vs LSG: एकाना मैदानात कोलकत्ताचा राडा, लखनौला पाजला पराभवाचा काढा…

KKR vs LSG: लखनौ विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला आली. कोलकातासाठी…

5 hours ago

पेण मधील साई भक्तांचा खासदार सुनिल तटकरेंना पाठिंबा

दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पेण (देवा पेरवी): पेण मधील साई भक्तांनी…

6 hours ago

मुरुड-बीच ला पर्यटकांची गर्दी…तप्त वातावरणातही पर्यटकांनी घेतला आनंद….

मुरुड( संतोष रांजणकर): मु‌रुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…

7 hours ago