नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर आता सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे. हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून सरकारकडून दक्षता घेण्यात येत आहे.
सरकारने म्हणलं आहे की, बीबीसीसह सर्व विदेशी वाहिन्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना भारतात प्रसारण करण्याचा त्यांचा परवाना हा त्यांना दिलेला एक विशेषाधिकार आहे. मात्र हा अधिकार मिळाला असला तरी देखील देशातील नियम आणि कायदे पाळणे त्यांना बंधनकारक आहे. मात्र तरी देखील तुम्ही तुमचे पुर्वग्रह देशात पसरवत असाल तर तुम्हाला भारतात प्रसारण करण्याचा तुमचा अधिकार नाकारण्यात येऊ शकतो.
केंद्र सरकारकडून ६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे. कारण बीबीसीकडून पहलगाम दुर्घटनेनंतर प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये बीबीसीने भारतीयांचे व्हिसा पाकिस्ताने निलंबित केले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दहशतवाद्यांना दहशतवादी नाही तर उग्रवादी म्हटलं आहे. मात्र हे उग्रवादी नसून दहशतवादीच होते. जे पाकिस्तानमधून आल्याचं देखील सांगितलं जात आहे. देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्यात बीबीसीने मात्र वेगळी भूमिका घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
All foreign channels including @BBCWorld must know that their license to broadcast in India is a privilege, and is subject to the rules and laws of India.
If you start pushing ur prejudices and biases, odds are that you will loose ur access to the Indian audience/market https://t.co/ThW4A2eOW5
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@RajeevRC_X) April 28, 2025
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण ६.३ कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.