मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र या सामन्यात खेळाडू आणि अंपायर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. खरंतर, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा बदल पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी देण्यात आला. या सामन्यात टॉस जिंकत हार्दिक पांड्याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.
केले हे ४ मोठे बदल
या सामन्यात बीसीसीआयकडून चार मोठे बदल करण्यात आले. पहिला हा की या सामन्यादरम्यान खेळाडू आणि अंपायर पहलगाम हल्ल्यातील पिडीतांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतून हाताला काळी पट्टी बांधतील. या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दु:ख झाले आहे.
Standing in solidarity with the victims of the Pahalgam terror attack. Prayers for the families who lost their loved ones in this gruesome attack 💔 pic.twitter.com/KXAJelZ1n3
— BCCI (@BCCI) April 23, 2025
दुसरी बाब म्हणजे हा सामना सुरू करण्याआधी एक मिनिटांचे मौन बाळगण्यात आले. तिसरी बाब म्हणजे हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये या सामन्यात चीअरलीडर्स असणार नाहीत. तर चौथी बाब म्हणजे या सामन्यात कोणत्याही प्रकारची आतषबाजी होणार नाही.