मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा जीव गेला आहे. आणि २० जण जखमी झाले आहे. यातच आता सेलिब्रिटींनी आपला संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.
सोनू सूद
अभिनेता सोनू सूद पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हणाला की, “काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. सुसंस्कृत जगात दहशतवादाला जागा नसावी आणि हे घृणास्पद कृत्य अस्वीकार्य आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आणि जखमींना लवकरात लवकर आरोग्य मिळो ही प्रार्थना.
अक्षय कुमार
अभिनेता अक्षय कुमार ट्विट करत म्हणाला, ‘पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून मन हेलावून गेले. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणे हे निव्वळ क्रूरता आहे. मी पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करतो.
शरद पोंक्षे
अभिनेते शरद पोंक्षे फेसबूकवर पोस्ट करत म्हणाले ‘आता घरात घुसून मारा. एकालाही सोडू नका अमित शहा व मोदीजी…’ एवढंच नाही तर, अभिनेता संजय दत्त, अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सांगायचं झालं तर, पहलगाम हत्याकांडात अनेक लोक जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. सीआरपीएफची क्विक अॅक्शन टास्क फोर्स देखील दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.