Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीहिर्‍यांचा व्यवहार की फसवणुकीचा सापळा? नक्की काय घडलं?

हिर्‍यांचा व्यवहार की फसवणुकीचा सापळा? नक्की काय घडलं?

२ कोटींची रक्कम दिली, पण न हिरा मिळाला… ना पैसे परत! मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई : व्यवसायात पारख असते, पण विश्वासाचं काय? तो तुटला… तेही तब्बल २ कोटी रुपयांवर! एका हिरा व्यापाऱ्याने एका कंपनीकडून दागिन्यांचे व्यवहार करताना घेतलेला निर्णय त्याच्यावर जणू आर्थिक आघात ठरला आहे.

मुंबई पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात आणि त्यांच्या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी कथितपणे ४८ वर्षीय हीरा व्यापाऱ्याला ५ कॅरेट म्हणजे तब्बल ६० सोलिटेअर्स पुरवण्याचं आमिष दाखवून २ कोटी रुपये उकळले.

राहुल गांधींच्या मनावर परिणाम झालाय! भारताची बदनामी कुणाच्या अजेंड्यावर?

नेमकं काय घडलं?

हीरा व्यापाऱ्याची ओळख प्रवीण पटेल नावाच्या परिचिताच्या माध्यमातून चिराग कोठारी, निमीश कोठारी आणि परवेज मन्सुरी या तिघांशी झाली. व्यवहार ठरला. व्यापाऱ्याने विश्वास ठेवून त्यांच्या कंपनीच्या खात्यात संपूर्ण पैसे ट्रान्सफर केले.

पण नंतर काय?

ना हिर्‍यांचा पत्ता, ना पैशांचा मागमूस. वेळ गेली, अपेक्षा तुटली… आणि अखेर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली.

कायद्यानं हात उगारला…

१७ एप्रिल रोजी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी या तिघांविरुद्ध फसवणूक व विश्वासघाताचे गुन्हे नोंदवले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संबंधित कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू केला आहे.

व्यवसायात विश्वास हवा, पण प्रत्येक व्यवहारात सावधगिरी हवीच. एक चूक आणि करोडोंचं नुकसान! आता पाहावं लागेल, या व्यापाऱ्याला न्याय मिळतो, की हिर्‍यांसारखीच ही आशा पण हरवते?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -