मुंबई : पायलट होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. पूर्वी पायलट होण्यासाठी गणित आणि विज्ञान गरजेचं होत आता या निकषांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. DGCA च्या या निर्णयानंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेसोबत कला शाखेतील विद्यार्थ्यांनाही पायलट होण्याची संधी मिळणार आहे.
Pune News : पुणेकरांनो पुढील दीड महिने ‘या’ ब्रिज वरून जाणं टाळा
मिळालेल्या माहितीनुसार, १९९० च्या दशकापासून देशात फक्त विज्ञान आणि गणित विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच व्यावसायिक पायलट बनण्याची परवानगी आहे. पूर्वी, व्यावसायिक पायलट परवाना मिळविण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक होते. मात्र आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) व्यावसायिक पायलट होण्यासाठी पात्रता निकषांमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत कला आणि वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील व्यावसायिक पायलट बनू शकतील.
सध्या, व्यावसायिक पायलट होण्यासाठी, उमेदवाराला विज्ञान आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विमान उड्डाण करताना वैमानिकाला खूप गणिते करावी लागतात. वेग, वेळ आणि अंतर मोजावे लागेल. इंधनाचा वापर, नेव्हिगेशन, या सगळ्याचा गणितीय अभ्यास करणं गरजेचं असल्याने गणितातून शिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच कमर्शियल पायलट लायसन्स कोर्समध्ये, ग्राउंड ट्रेनिंग, सिम्युलेटर ट्रेनिंग आणि फ्लाइंग ट्रेनिंगचा सिद्धांत शिकवला जातो. याशिवाय, प्रॅक्टिकल देखील केले जाते. ग्राउंड ट्रेनिंगमध्ये विमान वाहतुकीची तत्त्वे, नियम आणि कायदे शिकवले जातात. तर सिम्युलेटर प्रशिक्षणात, प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव न घेता विमानाच्या विविध पैलूंची समज आणि प्रशिक्षण दिले जाते. उड्डाण प्रशिक्षणामुळे खऱ्या विमानात उड्डाण करण्याचा अनुभव मिळतो आणि विमान कसे नियंत्रित करायचे ते शिकवले जाते.