मुंबई : ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ मारुती इको कारने दुभाजकाला धडक दिली. या अपघातात रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) यांचा मृत्यू झाला. अपघातात गीता राजभर, खुशबू राजभर, सुलेखा वैद्य आणि चेतन नंदू पाटील हे चौघे जखमी झाले.
Mumbai : मुंबई शहर बॉम्बने उडवून देणार, डी कंपनीकडून मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात राहणारे दक्षिण मुंबईत मासे खरेदीसाठी जात होते. ही मंडळी मुंबईत मासे खरेदी करुन त्यांची ठाण्यात विक्री करत होते. व्यवसायाकरिता ते नियमित ठाणे ते दक्षिण मुंबई असा प्रवास करत होते. नेहमीप्रमाणे या वेळीही सर्व जण मासे खरेदीसाठी कारने निघाले होते. कार चेतन नंदू पाटील चालवत होता. त्याने रस्ता मोकळा बघून कारचा वेग वाढवला. वेग खूपच जास्त वाटल्यामुळे कारमध्ये बसलेल्या सर्वांनीच चेतनला जरा हळू चालव असे सांगून बघितले. पण चेतनने कारचा वेग कमी केला नाही. भरधाव वेगाने जात असताना नियंत्रण सुटले आणि ईस्टर्न फ्रीवेवर शिवडीजवळ मारुती इको कार दुभाजकाला धडकली. कार जोरात धडकल्यामुळे झालेल्या अपघातात रामजी जयस्वार (६०) आणि विनोद रामा वैद्य (५२) गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.