Thursday, April 17, 2025
Homeसाप्ताहिक'ती'ची गोष्टSummer Lip Care : उन्हाळ्यातसुद्धा ओठ फुटतात? या 'टिप्स' फॉलो करा

Summer Lip Care : उन्हाळ्यातसुद्धा ओठ फुटतात? या ‘टिप्स’ फॉलो करा

उन्हाळा सुरु झाला की सर्वानांच टेन्शन येतं. कारण त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. पण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे या सामान्य समस्या आहेत, मात्र उन्हाळ्यात ओठ फुटतात तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की असं का होतं? उन्हाळ्याच्या काळात आपल्याला त्वचेची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. डिहायड्रेशनमुळे जितका शरीरावर परिणाम होतो तितकाच आपल्या त्वचेवर देखील होतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक ब्युटी उत्पादनाचा वापर करतो. परंतु, ओठांचे सौंदर्य मात्र बिघडलेले असते. ओठ काळे पडणे, फाटणे किंवा कोरडे पडणे यांसारख्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. तर आज आपण उन्हाळ्यात ओठ का फुटतात याबद्दल जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यात ओठ फुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बदलते वातावरण, बदलत्या वातावरणाचा शरीरावर जसा परिणाम पडतो, तसा ओठांवर देखील होतो. गुलाबी आणि मुलायम ओठ असावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते आणि यासाठी अनेक मुली व महिला महागड्या उत्पादनाचा उपयोग करतात. पण या लेखातून आपण जाणून घेऊया काही सोपे घरगुती उपाय ज्याने उन्हाळ्यात ओठांची काळजी आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येईल.

खोबरेल तेल 

xr:d:DAE_pBYgXoM:190,j:6903287266660596632,t:23062909

खोबरेल तेल केवळ त्वचेचे पोषण करत नाही तर त्वचेची प्रतिकारशक्तीही वाढवते. कापसाच्या तुकडयाने किंवा स्वच्छ बोट खोबरेल तेलात बुडवून थेट ओठांवर झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळपर्यंत तसेच ठेवावे.

मध 

मध केवळ ओठांना मॉइश्चराइझ करत नाही तर फाटलेल्या ओठांना जळजळीपासूनही आरामदेतो. ओठ फाटण्यावर मध हा प्रभावी घरगुती उपाय आहे. ओठांवर मधाचा थर लावा, १०-१५ मिनिटे ठेवा. नंतर हलक्या हाताने पुसून टाका.

लिप बाम 

आपल्या ओठांना मऊ आणि मॉइश्चरायझ करण्यासाठी उत्तम असे लिप बाम वापरा. यामुळे आपले ओठ फुटणार नाही तसेच निरोगी देखील राहतील.

भरपूर पाणी प्या

 

ओठ निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे महत्वाचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास ओठ कोरडे पडू लागतात. यासाठी दिवसभरात शक्य होईल तितके पाणी प्या.

दही 

ओठांची त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज झाली असेल तर त्यावर दही लावू शकता. कमीत कमी १५ मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा, ज्यामुळे ओठ मुलायम आणि गुलाबी होतील.

लिपस्टिकचा वापर 

लिपस्टिकचा वापर जास्त प्रमाणात केल्याने ओठ कोरडे होतात. यासाठी जेव्हा ओठांना आपण लिपस्टिक लावतो तेव्हा ती काढण्यापूर्वी त्यावर लिप बाम लावा ज्यामुळे आपले ओठ कोरडे होणार नाहीत.

कोरफड जेल 

कोरफडमध्ये व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक घटक आढळतात. जे आपल्या ओठांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. कोरफड ओठांसाठी नैसर्गिक उपाय आहे. कोरफडमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याची आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते.

तूप

उन्हाळ्यात एक नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून तूप काम करते. याच्या वापरामुळे ओठ मऊ, कोमल आणि हायड्रेट राहतात. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे तूप लावल्यास सकाळपर्यंत त्यांचा कोरडेपणा कमी होतो.

(टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -