Saturday, April 19, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखऐतिहासिक स्थळांना जोडणारे ‘ट्रेन सर्किट’ स्वागतार्ह

ऐतिहासिक स्थळांना जोडणारे ‘ट्रेन सर्किट’ स्वागतार्ह

महाराष्ट्रामध्ये इतिहासप्रेमी नागरिकांची संख्या आजही लाखोंच्या घरामध्ये आहे. ऐतिहासिक गड-किल्ले, राजवाडे, स्मृतिस्थळे, नदी, सागर, तलाव, ऐतिहासिक लढायांची ठिकाणे, राजवाडे हे सर्व पाहण्यासाठी, तेथील इतिहासकालीन घडामोडींचा आढावा घेण्यासाठी इतिहासप्रेमींची कायम तगमग असते. धकाधकीच्या काळामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून वेळ मिळेल तेव्हा इतिहासप्रेमी आपली ‘तलफ’ भागविण्यासाठी एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन इतिहासाचा मागोवा घेत असतात. यासाठी त्यांना प्रवासासाठी प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो, दगदग सहन करावी लागते. इतिहासप्रेमींची ही तगमग लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच त्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडेदेखील पाठपुरावा केला आहे. त्या प्रयत्नांची, पाठपुराव्याची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्यांच्या परिश्रमाला केंद्राकडूनही कृतीतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. काँग्रेसची केंद्रात व राज्यात एकहाती सत्ता असतानाही इतिहासप्रेमींसाठी काही केले नाही, पण भाजपाने ‘करून दाखवले’, त्याचीच परिणती म्हणून लवकरच केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या माध्यमातून लवकरच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आता रेल्वेची भूमिका निर्णायक राहणार असून त्यादृष्टीने रेल्वेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात मुंबईसह इतर परिसरात १७ हजार कोटींची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्राबाबत रेल्वेचे सुरू असलेले प्रकल्प, विकासाच्या योजना याबाबत माहिती मिळाल्याने महाराष्ट्रामध्ये रेल्वे राबवत असलेल्या प्रकल्पाची महाराष्ट्रीय जनतेला माहिती झाली. मुंबईतील अनेक रेल्वे प्रकल्पांची कामं प्रगतिपथावर आहेत. राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावर्षी जवळपास २४ हजार कोटी राज्याला मिळाले आहेत. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने १० दिवस प्रवास करता येणार आहे. विदर्भाचा छत्तीसगड-तेलंगणासोबतचा व्यवहार वाढणार आहे. गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनचा दुहेरीकरण याकरिता ४८१९ कोटी रुपये हे केंद्र सरकारने या ठिकाणी दिलेले आहेत आणि यामुळे निश्चितपणे जो विदर्भाचा भाग आहे, त्याला एक मोठा फायदा होणार आहे. विशेषत: छत्तीसगड आणि तेलंगणाचा जो व्यापार आणि व्यवहार आहे हा विदर्भाचा विकास होण्यासाठी, कायापालट होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. गोंदिया अशा ठिकाणी आहे की, जिथे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोघांची बॉर्डर आहे आणि पलीकडे बल्लारशापासून तेलंगणा आणि तिकडे आंध्र प्रदेश आपल्याला मिळतो. त्यामुळे अतिशय स्ट्रॅटेजीक अशा प्रकारची ही जी लाईन आहे. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा केंद्र सरकारकडून विकास केला जाणार आहे. या रेल्वे स्थानकांचा विकास रेल्वे मंत्रालय करणार आहे. त्यामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही समावेश आहे.

महाराष्ट्राच्या विकासाला केंद्राकडून नेहमीच झुकते माप दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने भाषणातून, विविध कार्यक्रमातून करत असतात. त्या घोषणा या केवळ घोषणा न राहता, त्या प्रत्यक्षात साकारल्या जात असल्याचे नेहमीच कृतीतूनही पाहावयास मिळत आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये १ लाख ७३ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळालेले आहेत. २०१४ पूर्वीचा मागोवा घेतल्यास यूपीए सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्राला दहा वर्षांत दहा हजार कोटी रुपये देखील एकत्रितपणे दिलेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रकल्प महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींच्या पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरिता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. ज्यामध्ये सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. यामार्फत दहा दिवसांची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, जागा, त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना ही रेल्वे जोडणार आहे. गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाकरिता ४ हजार ८१९ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे निश्चितपणे विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. छत्तीसगड आणि तेलंगणासाठी व्यापार, व्यवहार वाढण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची रेल्वे लाईन आहे. गोंदियातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सीमा आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिक लाईन मंजूर झाल्याचे खरे श्रेय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आहे. १ लाख ७३ हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रावर खर्च करत आहे. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या स्थानकांचे वर्ड क्लास ट्रान्स्फर्मेशन होत आहे. शिवरायांच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन ही १० दिवसांची रेल्वे टूर असणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता लवकरच सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किटच्या माध्यमातून ज्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे दहा दिवसांचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही विविध महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळ आहेत, याला जोडणारी सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करत आहे. महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारेल आणि विशेषतः विदर्भाला मोठा फायदा होईल. केंद्र सरकारच्या रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत विकासाचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्याला अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जात आहे. रेल्वे स्थानकांचेही सुशोभीकरण केले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -