Saturday, April 19, 2025
HomeदेशTahawwur Rana : तहव्वूर राणाची चौकशी सुरू, 'या' प्रश्नांची जाणून घेणार उत्तरं

Tahawwur Rana : तहव्वूर राणाची चौकशी सुरू, ‘या’ प्रश्नांची जाणून घेणार उत्तरं

मुंबई : मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अठरा दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी तहव्वूर राणाला १४ बाय १४ च्या खोलीत ठेवले आहे. एनआयएचे १२ अधिकाऱ्यांचे पथक त्याची चौकशी करत आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला एनआयए कोठडी दिली आहे. या कोठडीतच त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती तहव्वूर राणा विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!

Eknath Shinde : “साधा भोळा चेहरा अन् भानगडी सोळा”…उपमुख्यमंत्री शिंदेंची उबाठावर टीका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाला विचारले जात असलेले प्रश्न

मुंबईत अतिरेकी हल्ला २६ नोव्हेंबर २००८ रोजी झाला त्यावेळी तू कुठे होतास ?

तू ८ नोव्हेंबर २००८ ते २१ नोव्हेंबर २००८ या काळात कुठे कुठे होता ?

भारतात तू कोणाकोणाला भेटलास ?

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेकी हल्ला होणार असल्याचे तुला कधी कळले होते ?

डेव्हिड कोलमन हेडलीला कधीपासून ओळखतो ? हेडलीला बनावट व्हिसा वापरुन भारतात का पाठवण्यात आले होते ?

डेव्हिड कोलमन हेडली भारतात काय करण्यासाठी आला होता ?

डेव्हिड हेडलीने भारतातील कोणत्या ठिकाणांना भेट दिली आणि त्याबाबत तुला काय सांगितले ?

मुंबई हल्ल्यात तुझी आणि हेडलीची भूमिका काय होती ?

हेडलीला भारतीय व्हिसा मिळविण्यासाठी तू कशी मदत केलीस ?

मुंबई हल्ल्यातील तुमची भूमिका नेमकी कशा प्रकारची होती ?

हल्ल्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी तू नेमके काय केले ?

हल्ल्याच्या नियोजनासाठी तू आणि हेडलीने नेमके काय केले ?

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिझ सईदला तू कसा काय ओळखतो ? हाफिझला पहिल्यांदा कधी कुठे आणि का भेटलास ?

हाफिझ सईद आणि तुझे संबंध कसे होते ?

लष्कर-ए-तोयबाला तू कशी मदत केली आणि त्या बदल्यात तोयबाने तुला काय दिले ?

लष्कर-ए-तोयबातील इतर कोणाकोणाला ओळखतोस ?

लष्कर-ए-तोयबाची रचना कशी आहे ? भरतीप्रक्रिया कशी राबवतात ? कोण कोण काय काय काम करतात ?

तोयबाला निधी कोण पुरवतो ? सर्वात जास्त निधी कुठुन येतो ? निधी मिळवण्यासाठी कोण काम करतं आणि कशा प्रकारे हे काम होतं ?

तोयबाला शस्त्रांचा पुरवठा कुठुन होतो ? कोणत्या देशांमधून शस्त्रे मिळतात आणि ती कोण पुरवतात ?

पाकिस्तानचे सैन्य आणि आयएसआय कशा प्रकारे मदत करतात ?

हल्ल्यासाठी लक्ष्याची निवड करणे कशी करतात ? आयएसआय हल्ला करण्याचे निर्देश कधी देते ?

लष्कर आणि हुजीच्या लोकांना कोण प्रशिक्षण देते ?

किती आयएसआय अधिकारी कोणत्या गटाला प्रशिक्षण देतात ? प्रशिक्षणाचे स्वरुप काय असते ? प्रशिक्षणादरम्यान काय सांगतात ? प्रशिक्षणात काय करतात ?

डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायचे सोडून अतिरेकी मार्गावर का वळलास ? हेडलीचा नेमका हेतू काय ?

आयएसआयसोबतचे तुझे संबंध कसे आहेत ? आयएसआय आणि तुझी ओळख हेडलीमुळे झाली की तू हेडलीची ओळख आयएसआयशी करुन दिली ?

आयएसआयचा काय प्लॅन होता, ज्या ठिकाणी हल्ले झाले तेच एकमेव लक्ष्य होते की भारतातील इतर काही लक्ष्य होते जे तुम्ही साध्य करू शकला नाही ?

हल्ल्यांमध्ये आयएसआयच्या बाजूने फक्त मेजर इक्बाल आणि समीर अलीच सहभागी होते की इतर काही वरिष्ठ अधिकारीही सामील होते ? जर ते सामील होते तर ते लोक कोण होते ?

अतिरेकी कारवायांसाठी कोण मदत करते ?

आयएसआय व्यतिरिक्त, पाकिस्तान सरकारलाही अतिरेकी हल्ल्यांबाबत माहिती दिली जाते का ?

हल्ला सुरू असताना अतिरेक्यांना कोण सूचना देत असते ?

मुलांना आत्मघातकी हल्ल्यांसाठी तयार करण्यासाठी काय सांगितले जाते ?

हल्ल्याच्या नियोजनात किती लोक सामील आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे ?

स्वतः विषयी आणि स्वतःच्या कुटुंबाविषयीची माहिती दे

पत्नीला घेऊन भारतात का आलास ?

कुटुंबातील किती जणांना हल्ल्याविषयी पूर्वकल्पना दिली होती आणि का ?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -