नवी दिल्ली : अमेरिकेने चिनी मालावर १२५ टक्के आणि चीनने अमेरिकेच्या मालावर ८४ टक्के टॅरिफ लागू केला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध सुरू झाले आहे.
चीनसाठी अमेरिकेत माल विकणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत मोठी बाजारपेठ म्हणून चीन फक्त भारतातचाच विचार करू शकतो. भारताची लोकसंख्या १४६ कोटींपेक्षा जास्त आहे. यात मध्यमवर्गीयांचे आणि तरुण पिढीचे प्रमाण मोठे आहे. यामुळे चीनसाठी भारत हीच आता मोठी आणि सक्षम बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ बळकावण्यासाठी चीन सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना पुढील काही महिने भारतात स्वस्तात विकण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन, स्मार्ट फ्रीज, स्मार्ट टीव्ही यांच्यासह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू पुढील काही महिने भारतात स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे.