वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन
मुंबई : पुलाचा गर्डर टाकण्यासाठी किंवा अभियांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून रेल्वे (Railway Administration) मार्गावर दर रविवारी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येतो. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर पुढील दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी एक दोन नव्हे तब्बल ३४४ लोकलसेवा रद्द करण्यात येणार असल्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा होणार असल्याचे शक्यता वर्तवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन करण्यात आाले आहे.
प्रसाद ओक, सई ताम्हणकरचा ‘गुलकंद’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज, तुम्ही पाहिलात का?
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर माहिम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान उपनगरीय लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अप-डाऊन धिम्या मार्गावर शुक्रवारी रात्री ११ ते सकाळी ८ वाजून ३० मिनिटे तर अप-डाउन जलद मार्गावर रात्री १२ वाजून ३० मिनिटं ते सकाळी ६ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे.
ब्लॉकदरम्यान शुक्रवारी कसे असेल वेळापत्रक?
शुक्रवारी रात्री १० वाजून २३ मिनिटांनंतर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व डाऊन धिम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या अप धिम्या लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत. परिणामी महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकात लोकल उपलब्ध नसणार आहेत.
शनिवारी कसा असेल ब्लॉक
शनिवारी ब्लॉक दरम्यान अप डाउन धिम्या मार्गावर रात्री ११ वाजून ३० मिनिटं ते सकाळी ९ वाजेपर्यंत आणि अप जलद मार्गावर रात्री ११ वाजून ३० मिनिटं ते सकाळी ८ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान चर्चगेट-दादर दरम्यान जलद लोकल धावणार आहे. यामुळे शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर बोरीवली वरून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार. तर चर्चगेट विरार शेवटची लोकल शनिवारी रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी सुटणार आहे.
त्याचबरोबर चर्चगेट-विरार पहिली धीमी लोकल सकाळी ८ वाजून ८ मिनिटांनी सुटेल. तर, रविवारी भाईंदर-चर्चगेट पहिली लोकल सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी धावणार आहे. तसेच विरार-चर्चगेट पहिली जलद लोकल सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी सुटणार असून चर्चगेट-विरार पहिली जलद लोकल सकाळी ९ वाजून ३ मिनिटांनी सुटेल.