Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीSummer News : आईस्क्रीम खाताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करत असाल तर ही...

Summer News : आईस्क्रीम खाताना तुम्हीसुद्धा ‘ही’ चूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

भंडारा : भर उन्हाच्या कडाक्यात आईस्क्रीम खाण्याची लहर येणे साहजिकच आहे. मात्र हा आईस्क्रीम विकत घेताना ग्राहक त्याची माहिती जाणून न घेता खरेदी करतात. मोठ्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करताना ग्राहक ब्रँडच्या विश्वासार्हतेवर वस्तू खरेदी करतात. याचाच फटका भंडाऱ्यातील तुमसरा भागातील रिलायन्स मार्टमधून एक्सपायरी डेट संपलेल्या आईस्क्रीमची विक्री केली जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. आईस्क्रीमचा खप संपवण्यासाठी मुख्य एक्सपायरी डेट लपवण्यासाठी दुकानदाराने जुन्या एक्सपायरी डेटवर स्टिकर लावल्याचे समजते आहे.

Devgiri Fort : देवगिरी किल्ला आगीच्या विळख्यात!

मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील तुमसरा भागातील अभिषेक भुरे हा तरुण तुमसर शहरात असलेल्या रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये आईस्क्रीम खरेदी करायला गेला होता. यावेळी त्याला एक्सपायरी झालेली आईस्क्रीम विकत देण्याचा प्रयत्न मॉलमधील कर्मचाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार काल (दि ७) रात्री उघडकीस आला. दिनशाज कंपनीची संत्रा बर्फी फ्लेवरची आईस्क्रीमची त्याने मागणी केली. त्याला तो आईस्क्रीमचा बॉक्स देण्यात आला, त्या बॉक्सवर एकावर एक दोन स्टिकर लावल्याचे आढळून आल्याने त्याने वरील स्टिकर काढला. खालच्या स्टिकरवर त्याला एक्सपायरी डेट संपली असल्याचं समजलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -