छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील देवगिरी किल्ला आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची बातमी समोर आली आहे. भर उन्हाच्या कडाक्यात देवगिरी किल्ल्याला सकाळच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीला आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.
Thane Water Supply News : ‘या’ दिवशी राहणार ठाण्यातील पाणी पुरवठा बंद!
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर मधील इतिहासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या दौलताबाद अर्थात देवगिरी किल्ल्याला चारही बाजुंनी आगीने घेरले आहे. आज सकाळी ८च्या दरम्यान ही आग लागली असल्याची माहिती मिळाली आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे ही आग भडकली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना आगीचे लोट पसरलेले आहे. तसेच आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणांत धूर पसरला असल्याचे समजते आहे.
यादरम्यान किल्ल्यावर वास्तव्यास असलेले लहान मोठे जीवाणू प्राणी जळून नष्ट झाले असून, मोर, लांडोर, माकडं आदि प्राणी सौरावैरा पळू लागली आणि त्यांनी किल्ल्याच्या परिसरातील शेतात आश्रय घेतला. किल्ला प्रशासनाने अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अग्निशमन दलाच्या वाहनाला किल्ल्यात प्रवेश करण्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. आग विझवण्याचे कोणतेही साधन नसताना त्या ठिकाणी असलेल्या हिरव्या झाडाच्या फांद्या तोडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची पोलीस चौकशी करत आहेत.