Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजGrand Road Bridge : पूर्वमुक्त मार्ग ते ग्रँटरोड पुलाचे बांधकाम होणार रद्द?

Grand Road Bridge : पूर्वमुक्त मार्ग ते ग्रँटरोड पुलाचे बांधकाम होणार रद्द?

एमएमआरडीएच्या माध्यमातून भूयारी वाहतूक मार्गाचा पर्याय असतानाही समांतर पुल बांधण्याचा प्रयत्न

पूल विभागासाठी होणार आहेत सुमारे तीन हजार कोटींच्या खर्चाला मान्यता, कंत्राटदाराचीही निवड

मुंबई : पूर्व मुक्त मार्गावरून थेट ग्रँटरोडला (Grand Road) प्रवास करता यावा याकरता महापालिकेच्यावतीने (BMC) पूर्व मुक्त मार्ग(ऑरेंज गेट) पासून ते ग्रँटरोड नाना चौक या भागापर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे ३००३ कोटी रुपयांचा खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या पुलाच्या बांधकामासाठी प्रत्यक्षात कंत्राटदाराची निवड करण्यात आल्यानंतर या पुलाचे बांधकाम रद्द करण्याच्या विचारात महापालिका प्रशासन (Municipal Corporation) आहे. या मार्गावर एमएमआरडीएच्या वतीने समांतर भूमिगत मार्ग कोस्टल रोडला जोडला जावू शकतो, तर या पुलाची गरज काय असा युक्तीवाद समारे आल्याने या पुलाच्या बांधकामावर मंत्रालयातून लाल शेरा मारल्याने या पुलाचे बांधकाम रद्द करून गुंडाळण्याची वेळ महापालिकेच्या पुल विभागावर आली असल्याचे बोलले जात आहे.

Konkan Railway : चाकरमान्यांचा प्रवास होणार गारेगार! कोकण रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल

पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामांसाठी २० जानेवारी २०२४ रोजी निविदा मागवून १ मार्च रोजी प्रशासकीय मान्यतेने जे कुमार-आरपीएस या संयुक्त भागीदारातील कंपनीला विविध करांसह ३००३ कोटी रुपयांच्या कंत्राट कामाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे १ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता आणि २ मार्च २०२४ रोजी प्रशासकांची मंजुरी देत कार्यादेश देण्यात आला होता.

तत्कालिन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या पुलाच्या कामाच्या निविदेला गती दिल्याचे बोलले जात होते. या पुलाच्या बांधकामामुळे पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्रि वे) ऑरेंज गेट ते ग्रँटरोड मधील ताडदेव व नाना चौक या अंतरासाठी सध्याच्या स्थितीत ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. तिथे या उड्डाणपुलाच्या प्रस्तावित बांधकामामुळे हे अंतर ६ ते ७ मिनिटांचे होईल असा दावा प्रशासनाने केला होता. पूर्वमुक्त मार्ग ऑरेंज गेटपासून जे राठोड मार्ग, हँकॉक पूल, रामचंद्र भट्ट मार्ग, जे. जे. उड्डाणपूल, एम.एस. अली मार्ग व पठ्ठे बापुराव मार्ग अशाप्रकारे या पुलाचे बांधकाम केले जाणार होते.

परंतु आता या पुलाच्या बांधकामाला मंत्रालयातून लाल दिवा दाखवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पुलाचे बांधकाम रद्द करण्याच्या विचारात पूल विभाग आहे. सध्या कंत्राटदाराला कार्यादेश देण्यता आला असला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. विशेष म्हणजे एमएमआरडीएच्या माध्यमातून इस्टर्न फ्रि वे ते कोस्टल रोड जोडणाऱ्या भूमिगत वाहतूक मार्गाचे काम एल अँड टी च्या माध्यमातून सुरु असल्याने या पूलाची गरज काय प्रश्न उपस्थित करत या पूलाच्या बांधकामाच्या फाईलवर लाल शेरा मारुन ठेवण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पूलाचे काम रद्द करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी दोन मार्गिका तयार करून जनतेच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याने पुलाचे बांधकाम रद्द केले जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -