Tuesday, April 8, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वजागतिक पडझडीने ‘सेन्सेक्स’ ९०० ने घसरला

जागतिक पडझडीने ‘सेन्सेक्स’ ९०० ने घसरला

मुंबई : व्यापार युद्धाचा भडका आणि अमेरिकेसह जगभरावर मंदीच्या छायेच्या चिंतेतून जागतिक बाजारपेठांमध्ये झालेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे शुक्रवारी स्थानिक बाजारातही भीतीदायी पडसाद उमटले. प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ९०० अंशांहून अधिक घसरण होऊन तो ७६,००० च्या पातळीच्या खाली ढासळला.खनिज तेलाच्या किमतीतील घसरण आणि निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि इन्फोसिस या बाजारातील दिग्गज कंपन्यांच्या समभागात विक्री झाल्याने बाजारातील निराशेत आणखी भर पडली, असे विश्लेषकांनी मत व्यक्त केले.

परिणामी सप्ताहातील अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९३०.६७ अंशांनी म्हणजेच १.२२ टक्क्यांनी घसरून ७५,३६४.६९ वर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,०५४.८१ अंश गमावत ७५,२४०.५५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३४५.६५ अंशांची (१.४९ टक्के) घसरण झाली आणि तो २२,९०४.४५ पातळीवर बंद झाला.जागतिक शेअर बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात प्रमुख निर्देशांकांमध्ये पडझड झाली.

GOLD : रामनवमीचा योग साधून सोनं खरेदी करणार आहात ? मग जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

क्षेत्रीय पातळीवर विविध निर्देशांक प्रत्येकी २-६ टक्क्यांपर्यंत घसरले. ट्रम्प यांच्या नवीन व्यापार धोरणामुळे मंदी येण्याची शक्यता असून अमेरिकेतही महागाई वाढेल. आगामी काळात हे अरिष्ट इतर प्रमुख अर्थव्यवस्थांनाही गिळंकृत करेल, या भीतीने गुंतवणूकदारांमध्ये घर निर्माण केले आहे. मंदी आली तर मागणीला फटका बसण्याच्या शक्यतेने धातू आणि तेल वितरण कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली, असे निरीक्षण मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी नोंदवले.

गुरुवारी अमेरिकेच्या प्रमुख शेअर बाजार निर्देशांकांमध्ये २०२० नंतरची सर्वात मोठी टक्केवारीतील घसरण नोंदवण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर कर धोरणामुळे जागतिक मंदीच्या भीतीने एस अँड पी ५०० निर्देशांकातील कंपन्यांनी एकत्रितपणे २.४ (ट्रिलियन) लाख कोटी अमेरिकी डॉलरचे बाजार मूल्य केवळ काही तासात गमावले. १६ मार्च २०२० रोजी जागतिक बाजारपेठेत करोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जे नुकसान झाले, त्यानंतरचा हा एका दिवसातील सर्वात मोठा तोटा आहे. नॅसडॅक निर्देशांकानेही सहा टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदविली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -