Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीवसई रोड येथील नवीन टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजुरी

वसई रोड येथील नवीन टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजुरी

मुंबईत आणखी एक नवीन टर्मिनस होणार

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर लवकरच आठवे टर्मिनस होणार आहे. अलीकडेच रेल्वे मंडळाने या टर्मिनससाठी मंजुरी दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकाजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १५० कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजुर केला जाणार आहे. या नवीन टर्मिनसमुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या २०२३-२४ या वर्षातील वाहतूक सुविधा अंतर्गत नवीन प्रकल्पांसाठी नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वसई रोड येथील नवीन टर्मिनसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. लवकरच या प्रकल्पाचा आराखडा रेल्वेकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर इंजिनियरिंग स्केल प्लॅन तयार केला जाणार आहे.

नवीन टर्मिनसमध्ये टर्मिनसवर तीन मार्गिका असतील आणि येथून फक्त मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म रिटर्न ट्रेनसाठी एक आयलंड पॅसेंजर प्लॅटफॉर्म बांधला जाणार आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना ट्रेन उभ्या करण्याची सोय असेल, उर्वरित मार्गिकेवर ट्रेन पार्किंगची व्यवस्था असेल. नवीन टर्मिनस सुरू झाल्यावर आणखी १२ अतिरिक्त मेल /एक्स्प्रेस गाड्या चालवण्याची क्षमता वाढणार आहे. वसई रोड येथे नवीन कोचिंग टर्मिनस विकसित करण्याची योजना त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. रेल्वे बोर्डाने अलीकडेच या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

जोगेश्वरीवरदेखील नवीन टर्मिनस

पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान नवीन टर्मिनस बांधले जात आहे. या टर्मिनचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून ऑक्टोबरपर्यंत हे प्रवशांच्या सेवेत येण्याती शक्यता आहे. या टर्मिनसवर तीन मार्गिका असून त्यावरून केवळ मेल / एक्स्प्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत. जोगेश्वरी टर्मिनसवरून १२ अतिरिक्त एक्स्प्रेस गाड्या भारतातील विविध भागांमध्ये धावणार आहेत. प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी टर्मिनसला राममंदिर स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. यासाठी फूटओव्हर ब्रिजचे बांधकाम करण्यात येणार आहे. बेट आणि होम प्रकारचे एकूण २ प्लॅटफॉर्म आणि ३ मार्गिका या नव्या टर्मिनसमध्ये असणार आहे. दोन मजली सेवा इमारती आणि पाच मजली स्टेशन इमारत असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -