Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीMhada Lottery : सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर! म्हाडाच्या नव्या घरांची निघणार लॉटरी

Mhada Lottery : सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर! म्हाडाच्या नव्या घरांची निघणार लॉटरी

मुंबई : आपलं हक्काचं घर असावं असे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मात्र सातत्याने वाडत चाललेल्या घरांच्या किंमतीमुळे लोक म्हाडा आणि सिडकोकडून निघणाऱ्या लॉटरीची वाट पाहत असतात. अशाच लोकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाकडून नव्या घरांची लॉटरी निघणार असल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Mhada Lottery)

म्हाडाचे सीईओ संजीव जैयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह पुणे, नाशिकमध्ये घरांच्या गरजा मोठ्या आहेत. परवडणारे घरे उपलब्ध करून देण्यात म्हाडाचा मोठा वाटा असतो. गेल्या वर्षभरात एक ते दोन लॉटरी काढल्या आहेत. त्यानंतर यंदा ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत ३ ते ४ हजार घरांची लॉटरी काढणार असल्याचे सांगितले आहे.

Pandharpur News : पंढरपुरात नॉनव्हेज विक्रीवर बंदी!

म्हाडाच्या घराच्या किंमती होणार कमी 

म्हाडा घराच्या किंमती इतर घरांपेक्षा कमी असल्यातरीही अनेक सर्वसामान्य लोकांच्या खिशाला दर परवडत नाहीत. त्यामुळे म्हाडाने याबाबत शासनाला लेखी स्वरुपात प्रस्ताव पाठवला आहे. जर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे संजीव जैयस्वाल यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले. (Mhada Lottery)

त्याचबरोबर कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी, मध्य उत्पन्न असलेल्या लोकांसाठी या सर्व गोष्टींमध्ये सूट दिली तर घराच्या किंमती ३० टक्क्यांनी नक्कीच कमी होतील, असे त्यांनी म्हटले. दुर्बल घटकांसाठी ओव्हरडेड चार्जेस कमी केले तर घराच्या ३५ टक्के कमी होऊ शकते.

दरम्यान, मुंबईच्या जमिनीच्या किंमती खूप जास्त आहे. या किंमती कोणत्याही शहराशी २५ टक्के ते १० टक्के घट केली आहे. याच्यापुढे ही घट होणे शक्य नाही. परंतु जर ओव्हरहेड चार्जेस कमी झाले तर कदाचित किंमती कमी होऊ शकतात. आता अल्पउत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या गटासाठी घराच्या किंमती ५० लाखांच्या आत करण्याचे आमचे प्रयत्न आहे.शासनाचे इन्फ्रास्टक्चर आणि कनेक्टिव्हिटी वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. (Mhada Lottery)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -