Friday, April 25, 2025
Homeक्रीडाIPL 2025IPL 2025: ७ सामने ४४४ धावा, ४ अर्धशतके आणि १ शतक...८.५ कोटींच्या...

IPL 2025: ७ सामने ४४४ धावा, ४ अर्धशतके आणि १ शतक…८.५ कोटींच्या साई सुदर्शनचा जलवा

मुंबई: आयपीएल २०२५च्या १४व्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ विकेटनी हरवले. या सामन्याचा हिरो ठरला साई सुदर्शन आणि जोस बटलर. जोस बटलर नाबाद राहिला आणि त्याने ७३ धावांची खेळी केली. मात्र साई सुदर्शनने गुजरातसाठी मोमेंट सेट केले आणि ४९ धावांची खेळी केली. साई सुदर्शन सातत्याने आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवत आहे.

गेल्या ७ डावांवर नजर

साई सुदर्शनच्या गेल्या ७ डावांवर नजर टाकल्यास त्यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश होतो. एकदा तो अर्धशतक बनवण्यापासून चुकला तर एकदाच साईला १० पेक्षा कमी धावसंख्या करता आली. ७ डावांत साई सुदर्शनने ४४४ धावा केल्यात. म्हणजेच ८.५ कोटी किंमतींत त्याने आयपीएलमध्ये अशी कमाल केलीये जी महागडे क्रिकेटरही करू शकले नाहीत.

गेल्या ७ डावांतील खेळी

65(39)
84*(49)
6(14)
103(51)
74(41)
63(41)
49(36)

या हंगामात दुसऱ्या स्थानावर साई सुदर्शन

या हंगामात आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास साई सुदर्शन दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर लखनऊचा निकोलस पूरन आहे. त्याने ३ सामन्यांत आतापर्यंत १८९ धावा केल्या आहेत. तर साई सुदर्शनने ३ सामन्यात १८६ धावा केल्यात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -