Friday, April 25, 2025
HomeदेशBJP President : कधी ठरणार भाजपाध्यक्ष ? लोकसभेतही झाली चर्चा

BJP President : कधी ठरणार भाजपाध्यक्ष ? लोकसभेतही झाली चर्चा

नवी दिल्ली : लोकसभेत वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी अचानक भाजपाध्यक्ष या पदाकडे थोड्या वेळासाठी चर्चा वळवली. जो स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सांगतो त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष अद्याप ठरलेला नाही. हे कसे ? असा प्रश्न अखिलेश यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगेच उत्तर दिले.

Ajit Pawar : आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत पण चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललंय! बीड दौऱ्यात अजित पवारांची सडेतोड भाषा

लोकसभेत असलेल्या इतर मोठ्या पक्षांचे अध्यक्ष हे पक्षाच्या पातळीवर चार पाच वरिष्ठ नेते ठरवतात. हे नेते प्रामुख्याने एकाच कुटुंबाशी संबंधित असतात. या उलट भारतीय जनता पार्टीत काही कोटी सदस्य आहेत. यातील किमान बारा – तेरा कोटी सदस्य पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत वेगवेगळ्या टप्प्यांशी संबंधित आहेत. यामुळे प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. पण लवकरच भाजपाध्यक्ष निवडला जाईल; असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

Waqf Board : वक्फ बोर्ड म्हणजे काय ? जाणून घ्या

अखिलेश यादव अध्यक्ष म्हणून २५ वर्षे समाजवादी पक्षाचे नेतृत्व करू शकतात. भारतीय जनता पार्टीचे तसे नाही. या पक्षात नेता निवड ही विविध घटकांवर अवलंबून असल्यामुळे वेळ लागत असल्याचे अमित शाह म्हणाले. त्यांनी लवकरच भाजपाध्यक्ष जाहीर होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -