नवी दिल्ली : भारतीय नौदलाने ३१ मार्च २०२५ रोजी हिंद महासागरात धडक कारवाई केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईद्वारे २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली.
#IndianNavy‘s Mission Deployed warship #INSTarkash successfully interdicted and seized over 2,500 kgs of narcotics in the the Western Indian Ocean.
Part of @IN_WesternFleet, INS Tarkash is deployed for Maritime Security Operations in the Western Indian Ocean and is undertaking… pic.twitter.com/Wg1MlkgiO3
— SpokespersonNavy (@indiannavy) April 2, 2025
हिंद महासागरात संशयास्पद हालचाली सुरू आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीआधारे आयएनएस तर्कश या युद्धनौकेने एका जहाजाला अडवून तपासणी केली. आयएनएस तर्कश या युद्धनौकेवरील नौसैनिकांनी संशयास्पद जहाजाची तपासणी केली. तपासणी करुन २५०० किलो अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू आहे.
भारतीय नौदलाने माहिती मिळताच P8I या समुद्रात दूरवर गस्त घालू शकणाऱ्या विमानाद्वारे हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एका जहाजाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या जहाजावर हेलिकॉप्टरद्वारे नौदलाचे कमांडो पथक पाठवण्यात आले. या पथकाने हेलिकॉप्टरमधून रश्शी टाकून थेट संशयास्पद जहाजावर वेगाने उतरत कारवाई केली. तपासणी केल्यावर जहाजावर २५०० किलो अमली पदार्थ सापडले. हवाबंद पाकिटांमध्ये हे अमली पदार्थ ठेवले होते. या संदर्भात चौकशी केल्यावर जहाजावर कोणालाही समाधानकारक उत्तर देता आले नाही. यानंतर वेगाने कारवाई करुन जप्ती करण्यात आली. तसेच जहाज नौदलाच्या नियंत्रणात ठेवून जवळच्या बंदरावर आणण्यात आले. जप्त केलेल्या मालात २३८६ किलो हशीश आणि १२१ किलो हेरॉईन आहे. हिंद महासागराच्या पश्चिमेकडील भागात कारवाई करण्यात आली आहे.