Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीBuldhana News : बुलढाण्यात तीन गाड्यांच्या भीषण अपघातात पाच ठार, २४ जखमी

Buldhana News : बुलढाण्यात तीन गाड्यांच्या भीषण अपघातात पाच ठार, २४ जखमी

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. यात वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज, बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी खाजगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली. जयपुर लांडे फाट्या समोर हा विचित्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच २४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.

Palghar Bank : बँकांनी मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करा; मनसेकडून बँकांना निवेदन

अधिक माहिती अशी की, अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती. याच वेळी पुण्याकडून परतवाडाकडे एक एसटी महामंडळाची बस जात होती. अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली. खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झाला आहे.

दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर चानेज ३२० जवळील एका पुलावर लोखंडी रॉडचा तुकडा तुटून महामार्गावर आल्याने रात्रीच्या वेळेस जवळपास आठ वाहनांची टायर फूटली आहेत. हा लोखंडी तुकडा तुटून पुलाच्या वर आल्याने यावर भरधाव वाहने धडकल्याने अनेक वाहनांची समोरची दोन्ही टायर फुटल्याने रात्रीच्या वेळेस वाहनधारक रस्त्यात अडकून पडले होते. समृद्धी महामार्ग प्रशासन व नियंत्रण कक्षाला या अडकलेल्या वाहनधारकांनी फोन केल्यावरही जवळपास तासभर वाहनधारकांना मदत मिळाली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -