Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीExtortion : झक मारली आणि कॅब चालकाशी मैत्री केली, पीडित महिलेला पश्चाताप!

Extortion : झक मारली आणि कॅब चालकाशी मैत्री केली, पीडित महिलेला पश्चाताप!

ॲप-आधारित कॅब चालकावर बलात्कार आणि १० लाख खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : एका ४१ वर्षीय महिलेशी मैत्री करून वारंवार बलात्कार आणि १० लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून एका ॲप-आधारित कॅब चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२३ पासून सुरू होता. त्रस्त झालेल्या महिलेने अखेर रविवारी वरळी पोलिसांकडे धाव घेतली, जिथे ‘शून्य एफआयआर’ नोंदवून हा गुन्हा एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, संबंधित महिला एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये तिने आरोपी अजित सिंगच्या कॅबमध्ये प्रवास केला, त्यावेळी दोघांमध्ये ओळख झाली आणि त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले. त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले.

Ghibli : सावधान! घिबलीच्या नादात संकटात सापडाल

महिलेच्या तक्रारीनुसार, २२ मार्च २०२३ रोजी आरोपीने वरळीतील एका हॉटेलमध्ये तिला गुंगीचे औषध मिसळलेले ज्यूस दिले आणि तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट करून त्याद्वारे ब्लॅकमेल करत वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

“महिलेचा आरोप आहे की, आरोपीने तिच्या लहान मुलाला मारण्याची धमकी देऊन तिच्याकडून १० लाखांची खंडणी घेतली. जेव्हा तिने अधिक पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेत फेसबुकवर तिच्याविषयी बदनामीकारक पोस्ट टाकली आणि तिला ‘कॉल गर्ल’ म्हटले.”

या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर रविवारी वरळी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ‘शून्य एफआयआर’ नोंदवून हा गुन्हा एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग केला.

आरोपी अजित सिंगवर भा. द. वि. न्या. संहिता अंतर्गत कलम ३०८(२) (खंडणी), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३५६(२) (बदनामी), ६४ (बलात्कार) आणि ६४(२) (वारंवार बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“आम्ही बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा नोंदवला असून महिलेच्या आरोपांची सखोल चौकशी करत आहोत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत,” असे एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -