मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगत आहे. सामन्यात केकेआरने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, मुंबईच्या गोलंदाजांपुढे केकेआरच्या फलंदाजांनी मात्र गुडघे टेकले. कोलकाताने मुंबईला विजयासाठी ११७ धावांचे आव्हान दिले ाहे.
मुंबईकडून पदार्पण केलेला गोलंदाज अश्विनी कुमारने या सामन्यात ४ विकेट घेत केकेआरला जबरदस्त धक्का दिला. कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब राहिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये ४ विकेट गमावले. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सुनील नरेनला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर दीपक चाहरने विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
यानंतर अश्विनी कुमारने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर कर्णधार अजिंक्य रहाणेला कॅच आऊट केले. तर दीपक चाहरने वेंकटेश अय्यरला बाद केले. वेंकटेश बाद झाल्यानंतर केकेआरची धावसंख्या ४ बाद ४१ इतकी होती.