सेवाव्रती : शिबानी जोशी
तन्वी’ हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे. तन्वी म्हणजे सुंदर. मानवी शरीराला अंतरबाह्य सुंदर ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उत्पादन करणारी कंपनी म्हणजे तन्वी हर्बल. ठाण्यामध्ये डॉक्टर मेधा मेहंदळे यांनी तन्वी प्रोडक्सचं छोट बीज रोवल, त्याचा आता जगभरात प्रसार झाला आहे.प्रसिद्ध तत्त्ववेत्यांनी म्हटलं आहे की, “यश हे क्षणिक असता कामा नये, त्याला स्थायी स्वरूप दिले पाहिजे. क्षणिक यश कोणत्याही प्रयत्नांशिवाय मिळू शकते. मात्र यशाला स्थिर स्वरूप देण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द, शिस्त आणि झोकून देण्याची वृत्ती लागते” आणि ही वृत्ती जोपासली आहे, गेल्या ३० वर्षांपासून अधिक काळ आरोग्यसेवेचे व्रत जपलेल्या तन्वी हर्बल्सच्या संचालिका डॉ. मेधा मेहेंदळे यांनी.
डॉ. सी. ग. देसाई यांची मुलगी डॉ. मेधा या आयुर्वेद अभ्यासक व निसर्गोपचारतज्ज्ञ. गिरीश मेहेंदळे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. संसार उभारत असतानाच काहीतरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यांचा उद्यमी स्वभाव त्यांच्या सासूबाईंनी ओळखला व त्यांना प्रोत्साहन दिले. घरात सर्वांचा आयुर्वेदावर प्रचंड विश्वास होताच. आपला हजारो वर्षांचा वारसा समाजाला उपलब्ध व्हावा म्हणन मेधा मेहेंदळे यांचे संशोधन सुरू झाले आणि तन्वी हर्बलचा प्रवास १९९२ साली सुरू झाला. तेजस्वी त्वचा, दाट केस, अॅसिडिटी, डोकेदुखी, पिंपल्स आणि हेअरफॉलवर तन्वीशता अशी उत्पादनं सुरू झाली आणि लेप, तेल, टॉनिक, टॅबलेटच्या माध्यमातून तन्वी हर्बल्स घराघरात पोहोचली.
मेधाताईंना सतत काम करण्याच्या अगोदर होते या आधी त्यांनी छंद म्हणून मुलांसाठीचे छंदवर्ग, साड्यांचे दुकान, डोसा मशीन, जादूच्या खेळांचे दुकान असे अनेक हौशी उद्योग केले होते. त्यानंतर मात्र त्या आयुर्वेदाच्या ताकदीत रमल्या.
मेधा मेहेंदळे यांच्या मते,‘उद्योजकाने सतत स्वतःला प्रश्न देत राहिले पाहिजे. इतर बाह्यप्रेरणेपेक्षा, लोक जेव्हा अंतःप्रेरणेने, स्वतःला वाटलं म्हणून काम करतात तेव्हा ती प्रेरणा ही खरी आणि कायमस्वरूपी टिकणारी असते.’डॉ. मेधाताईंचा उद्यमी स्वभाव त्यांना सतत नवनवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत असतो. नवनवीन गोष्टींना चालना मिळत असते. त्यामुळे केवळ तन्वी उत्पादनांची निर्मिती यावर मेधा ताई शांत बसल्या नाहीत, तर महाराष्ट्रभर तन्वी क्लिनिक्स त्यांनी सुरू केली.
‘रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा’ मानणाऱ्या डॉ. मेधा यांनी या हर्बल्स क्लिनिक्समध्ये पेशंटची मोफत तपासणी सुरू केली. घंटाळी येथील क्लिनिक सुप्रसिद्ध असून ठाण्यातील इटर्निटी मॉल, तसेच दादर आणि इतर तन्वी क्लिनिक्समध्ये पेशंटची फ्री हेल्थ चेकअपची सुविधा उपलब्ध आहे.महाराष्ट्रभरातील शंभरहून अधिक तन्वी क्लिनिक्स सुरू झाली. यामध्ये तन्वी फ्री चेकअप महाकॅम्पमध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, गुडघेदुखी, फर्टिलिटी, केसगळती, पिंपल्स, काळे डाग, मुलांची उंची, बुद्धी अशा अनेक तक्रांरीवर दर्जेदार एफडीए प्रमाणित गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. मेधा ताईंनी तन्वी हर्बल्सची एक छोटी पुस्तिका बनवली आहे. या पुस्तिकेतून छोट्या आजारांवरचे उपचार त्या सुचवतात. थोडक्यात तनवी हर्बल्सद्वारे डॉक्टरांचा सल्ला, उपचार आणि आयुर्वेदिक उत्पादन बनवली जातात.ताईंच्या दोन्ही मुली डॉ. रुचा आणि डॉ. मानसीनी हा वारसा पुढे चालविण्याचे ठरविले. घरातल्याच्या प्रत्येकाच्या क्षमता एकत्र आल्या, तर एक सामूहिक ताकद निर्माण होते त्यामुळेच आपल्या देशात अनेक पारंपरिक उद्योजक घराणी पाहायला मिळतात. मेधाताई सुद्धा संपूर्ण ‘कुटुंब रंगलंय उद्योगात ‘ असंच म्हणता येईल.
आज तन्वी हर्बल्सला केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातून देखील मागणी आहे. मेधाताईंना उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठीचे सूत्र विचारले असता त्या म्हणाल्या की, उत्पादनाची गुणवत्ता आणि दर्जा हा कायम उत्तम ठेवला पाहिजे. मागणीप्रमाणे पुरवठा झालाच पाहिजे, रास्त दरात उत्पादने उपलब्ध केली पाहिजेत व मुख्य पेशंटची सेवा हीच ईश्वरसेवा मानली पाहिजे.
डॉ. मेधा मेहेंदळे यांचे पती गिरीश मेहेंदळे यांची त्यांना कायमच साथ लाभली, शिवाय त्यांची ठाणे महापालिकेतील नोकरीतून निवृत्ती झाल्यावर त्यांनी अकांऊट्सची जबाबदारी पूर्ण पेलली आहे. डॉ. मानसी आणि डॉ. रुचा विविध महिला मंडळे, शाळा, कॉलेजेस्, विविध संस्थांमध्ये मोफत व्याख्याने देऊन आयुर्वेद प्रचाराचे व प्रसाराचे काम करत आहेत. मोठे जावई डॉ. पुष्कराज धामणकर तन्वी क्लिनिक्सची व तन्वी प्रसाराची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत, तर धाकटे जावई प्रतीक पै यांनी उत्पादन, वितरण, मार्केटिंग, डिस्ट्रिब्युशन अशी जबाबदारी घेतली आहे. डिजिटलायझेशनच्या जमान्यात तन्वीला हायटेक बनवण्यासाठी ते सर्वच प्रयत्नशील आहेत.
दुबई, बाहरेन, मलेशिया, सिंगापूर कॅनडा इ. ठिकाणी प्रदर्शनात तन्वी हर्बल्सचा स्टॉल असतो. क्लिनिक्समार्फत व ऑनलाईन फोनवरुन तन्वी डॉक्टरांशी सल्ला घेण्याची सुविधा आहे. तसेच www.tanviherbals.com या वेबसाईटवरुन ऑनलाईन तन्वीची औषधे खरेदी करता येऊ शकतात. तन्वी हर्बल औषधांनी डायबिटीस, बीपी, सांधे, गुडघेदुखी, इन्फर्टिलिटी, पार्किंसन्स, सोरायसिस, अस्थमा, मुलांची उंची, केस, त्वचा विकार अशा सर्व आरोग्य तक्रारींवर उत्तम गुण देण्याचे सेवाभावी कार्य डॉ. मेधा करत आहेत. त्यांचा सर्वात लोकप्रिय प्रॉडक्ट म्हणजे तन्वीशता टॅब्लेट्स. याला रुग्णांचा मोठा प्रतिसाद आहे.
मेधाताई केवळ पैसा कमावून नाही तर सामाजिक कार्यातही भाग घेत असतात. त्यांनी आयुष्यमान भव या टेलिफिल्मची निर्मिती केली आहे आणि या फिल्म्सना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. मेधा या आनंद विश्व गुरुकुल शाळेच्या संस्थापिका असून माजी अध्यक्षा आहेत. डॉ. मेधा मेहेंदळे यांच्या जीवनावर प्राध्यापिका डॉ. शुभा चिटणीस यांनी ‘तन्वीचे आभाळ’ हा चरित्रग्रंथ लिहिला आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मानसी व डॉ. रुचा या त्यांच्या डॉक्टर कन्या इन्स्टाग्रामवर तन्वी हर्बल्स पेजवर रोज हेल्थ टिप्स देत असतात, ज्या जनमानसात खूप लोकप्रिय आहेत. डॉ. मेधा यांना त्यांच्या व्यावसायिक यशाबद्दल प्रियदर्शनी पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा माधुरी दीक्षित यांच्या हस्ते मिळालेला महिला उद्योजिका पुरस्कार, उद्योगश्री पुरस्कार व ठाणे नगररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉक्टर मेधा यांनी आरोग्य सेवेचा संकल्प केला आणि तो सिद्धीस नेला. डॉ. मेधा यांना ‘तन्वी हर्बल्स’च्या रूपानं
आयुर्वेद जगभरात पोहोचवयाचा आहे. डॉ. मानसी आणि डॉ. रुचा ते करतीलच यात मला तिळमात्र शंका नाही.