Saturday, April 19, 2025
Homeक्राईमPune News : धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली ६ ते ७ अर्भकं आणि...

Pune News : धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली ६ ते ७ अर्भकं आणि मानवी अवशेष

पुणे : पुण्यातील दौंड शहरात असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगार्‍यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune News)

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ३ दिवसांची पोलीस कोठडी

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड शहरालगत (Daund Crime) असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगार्‍यात अर्भक आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आले. स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या ११२ क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक देखील या ठिकाणी बोलावले. हे अर्भक आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता दौंड पोलीस करत आहेत.

हे अर्भक आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरण्यांमध्ये ठेवली असून त्यावरती त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते २०२० मधील आहेत अशी प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. मात्र, या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे अर्भक आणि मानवी शरीराचे अवशेष कसे आले याचा शोध दौंड पोलीस घेत आहेत.हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील दौंड पोलीस सध्या तपास करत आहेत.वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -