Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : नागपूरमध्ये कशी झाली दंगल, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Devendra Fadnavis : नागपूरमध्ये कशी झाली दंगल, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई : छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन नागपूरमध्ये काही भागात दंगल झाली. या दंगलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. नागपूरमध्ये नेमकी कोणकोणत्या भागात दंगल झाली ? दंगलीला कशी सुरुवात झाली ? दंगलीमुळे झालेले नुकसान ? नागपूरमधील सध्याची स्थिती ? याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. दंगल करणारे, पोलिसांवर हल्ले करणारे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणारे यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विधानसभेत निवेदन देत मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये सोमवार १७ मार्च २०२५ रोजी दंगल का आणि कशी घडली याबाबतची सविस्तर माहिती दिली. संपूर्ण घटनाक्रम सांगितला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाजी कबर हटवावी अशी मागणी करत नागपूरमध्ये सोमवार १७ मार्च रोजी आंदोलन केले. यावेळी प्रतिकात्मक कबरीला आग लावण्यात आली. एक कापड जाळण्यात आले. या कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरली. ही अफवा पसरली आणि अत्तर ओळ येथून नमाज पढल्यानंतर २०० ते २५० लोकांच्या जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला.

पोलिसांनी सकाळी घडलेल्या घटनेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदारांना बोलवले होते. तर दुसरीकडे नागपूरच्याच हंसापुरी भागात २०० ते ३०० लोकांनी दगडफेक केली. काहींवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. अनेक वाहने जाळण्यात आली. हिंसाचाराची तिसरी घटना सायंकाळी साडेसात वाजता भालदारपुरा भागात झाली. ८० ते १०० लोकांचा जमाव तिथे होता. त्यांनी तिथे पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर व सौम्यबळाचा वापर केला. या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी आणि काही वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये ३३ पोलीस जमखी झाले आहेत. यात उपायुक्त दर्जाच्या तीन पोलिसांचा समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Nagpur Violence Update : नागपूरच्या अनेक भागात संचारबंदी!

नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगल करणारे, पोलिसांवर हल्ले करणारे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणारे यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवून नये; असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेली महत्त्वाची माहिती

नागपूर दंगलीत ३३ पोलीस जखमी
जखमी पोलिसांमध्ये तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी
एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार
नागपूरच्या ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी
तहसील, कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, लकडगंज, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोदरानगर, कपिलनगर या पोलीस ठाण्यात संचारबंदी
दंगलीमध्ये एक सुनियोजित पॅटर्न दिसला
दंगलीत एक क्रेन, दोन जेसीबी, काही चारचाकी वाहने जाळण्यात आली
एकूण ५ नागरिक जखमी झाले
जखमी नागरिकांपैकी तीन जणांना उपचार करुन घरी सोडले
दोन जखमी नागरिक अद्याप रुग्णालयात त्यापैकी एक आयसीयूमध्ये
तीन गुन्हे गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल
तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -