Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीNashik Update : पतंग उडवणं ८ वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतलं!

Nashik Update : पतंग उडवणं ८ वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतलं!

नाशिक : पतंग उडवताना तोल गेल्याने ८ वर्षीय चिमुकल्याचा गच्चीरून कोसळून जागीच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या गणेशनगरमध्ये काठी येथे घडली आहे. नक्ष संदीप बनकर असं मृत मुलाचं नाव असून तो इयत्ता तिसरीत शिकत होता. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने बनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Western Railway Update : रुळाला तडा गेल्याने पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले!

नवीन वर्षातील पहिल्या महिन्यातला पहिलावहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांत म्हटलं तीळगूळ, तिळाचे लाडू, आणि पतंग उडवण्याची चढाओढ हे सगळं सादरसंगीत होतच मात्र अनेकदा आवाहन करूनही पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरला जातो. यावर्षी याच नायलॉन मांजाने अनेकांची घर उध्वस्त केली आहेत. अशातच आता नाशिकच्या गणेशनगरमध्ये काठी येथे नक्ष संदीप बनकर ( वय ८ ) गच्चीवर बेभान होऊन पतंग उडवत असताना तोल गेल्याने गच्चीवरून कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. ही काल (दि २०) दुपारच्या सुमारास घडली असून नक्षच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -