Wednesday, February 5, 2025
Homeकोकणसिंधुदुर्गMLA Nitesh Rane : आ. नितेश राणे यांच्या मागणीवरून सीएसटी ते करमळी...

MLA Nitesh Rane : आ. नितेश राणे यांच्या मागणीवरून सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वे गाडीला वैभववाडीत थांबा

कणकवली :०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे याबाबतचा पत्रव्यवहार करून तातडीने हे थांबे मंजूर केले जावेत अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन प्रशासनाने वैभववाडी स्थानकावर ही गाडी जाता-येता थांबवण्याचे आदेश जारी केले आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे आमदार नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री तसेच रेल्वे प्रशासन यांचे आभार व्यक्त केले आहेत.

याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते गोव्यातील करमळी दरम्यान दररोज चालवण्यात येणाऱ्या विशेष गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी आणि सावंतवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत, असे जाहीर केले आहेत. हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे.

Spy Girls Of 2025 : आलिया भट्ट, कियारा आडवाणी स्पाय युनिव्हर्समध्ये मोठा बदल घडवण्यासाठी सज्ज

या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार विशेष गाड्या पुढीलप्रमाणे असतील : गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी-करमळी विशेष (दररोज) मुंबई सीएसएमटी येथून ००.२० वाजता दररोज २०/१२/२०२४ ते ०५/०१/२०२५ दरम्यान सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी १३.३० वाजता ती पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ करमळी-मुंबई सीएसएमटी विशेष (दररोज) करमळी येथून १४.१५ वाजता दररोज २०/१२/२०२४ ते ०५/०१/२०२५ दरम्यान सुटेल व मुंबई सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता ती पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम.

डब्यांची रचना : एकूण २२ डबे – प्रथम वातानुकूलित – १ डबा, मिश्रित (प्रथम वातानुकूलित + द्वितीय वातानुकूलित) -१ डबा, द्वितीय वातानुकूलित-३ डबे, तृतीय वातानुकूलित-११ डबे, स्लीपर-२ डबे, सामान्य -२ डबे, एसएलआर-२ डबे. या गाडीला सावंतवाडी आणि वैभववाडी या दोन महत्त्वाच्या तालुक्यात थांबा मिळाला असल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे, तसेच आमदार नितेश राणे यांनी हे थांबे मिळावेत म्हणून केलेल्या प्रयत्नाबद्दल जनतेतून आभारही व्यक्त केले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -