Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीSpy Girls Of 2025 : आलिया भट्ट, कियारा आडवाणी स्पाय युनिव्हर्समध्ये मोठा बदल...

Spy Girls Of 2025 : आलिया भट्ट, कियारा आडवाणी स्पाय युनिव्हर्समध्ये मोठा बदल घडवण्यासाठी सज्ज

मुंबई : भारतीय सिनेमातील दोन ताकदीच्या अभिनेत्री, आलिया भट्ट (Alia Bhat) आणि कियारा आडवाणी (kiara Advani), २०२५ मध्ये “अल्फा” आणि “वॉर २” (War 2) च्या माध्यमातून स्पाय युनिव्हर्सला नवा आयाम देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघींनीही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली असून, आता त्या या जगात सशक्त महिला भूमिकांना नवी परिभाषा देणार आहेत.

सेंट्रल रेल्वेच्या प्रवाशांचा आज लेट मार्क लागणार!

“अल्फा” या चित्रपटात आलिया भट्टची भूमिका हे या युनिव्हर्ससाठी एक रोमांचक पाऊल ठरणार आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे ती जासूसी आणि ॲक्शनच्या नव्या जॉनरमध्ये स्वतःला पुन्हा सिद्ध करणार आहे. आलियाने नेहमीच आपल्या पात्रांमध्ये ताकद दाखवली आहे, ज्यामुळे तिच्या “अल्फा” मधील भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

कियारा आडवाणीचं या युनिव्हर्समध्ये येणं ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी कास्टिंग अनाऊंसमेंट आहे. कियारा या स्पाय ॲक्शन थ्रिलरमध्ये जबरदस्त स्टंट्स सीन्स मध्ये दिसणार आहे. याबाबत चाहत्यांमध्ये आधीपासूनच चर्चा होत आहे की कियाराची एनर्जी आणि अभिनयाची शैली “वॉर २” मधील तिच्या भूमिकेत प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे.

आलिया भट्ट आणि कियारा आडवाणी यांच्यासारख्या दोन दमदार अभिनेत्रींच्या येण्याने स्पाय युनिव्हर्सचं आकर्षण आणखीनच वाढलं आहे, यात शंका नाही. त्यांच्या अभिनयातून या युनिव्हर्समध्ये नव्या गोष्टी अनुभवायला मिळतील, आणि २०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी स्पाय थ्रिलर्ससाठी नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -