Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीOne plus 12वर १० हजारांचा डिस्काऊंट, Amazon sale मध्ये ऑफर

One plus 12वर १० हजारांचा डिस्काऊंट, Amazon sale मध्ये ऑफर

मुंबई: नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर One plus 12वर मिळत असलेल्या ऑफरचा तुम्ही लाभ उचलू शकता. कंपनी दिवाळीच्या ऑफरमध्ये या फोनवर अनेक हजारांचा डिस्काऊंट देत आहे. तुम्ही हा फोन स्वस्तात Amazon आणि वन प्लसच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता.

OnePlus Diwali Sale अंतर्गत तुम्ही या स्मार्टफोनवर अनेक हजार रूपयांचा डिस्काऊंट मिळवू शकता. कंपनीने हा फोन ६४,९९९ रूपयांना लाँच केला होता. दरम्यान, सध्या हा स्मार्टफोन ६१,९९९ रूपयांना ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazonवर मिळत आहे. यावर बँक ऑफरही मिळत आहे.

यावर ७ हजार रूपयांचा बँक डिस्काऊंट मिळत आहे. ही ऑफर आयसीआयसीआय बँकच्या क्रेडिट कार्डवर मिळत आहे. याचा तुम्ही फायदा उचलू शकता. सर्व डिस्काऊंट मिळवल्यानंतर या फोनची किंमत घटून ५४,९९९ रूपये होते. म्हणजेच तुम्ही यावर साधारण १० हजार रूपयांची बचत करू शकता.

One plus 12 ५जीमध्ये तुम्हाला ६.८२ इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. हा 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात गोरिला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन qualcomn snapdragon 8 gen 3 प्रोसेसरवर काम करतो. यात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो.

या स्मार्टफोनमध्ये ५० एमपी+६४ एमपी+४८ एमपी रेयर कॅमेरा आणि ३२ एएमपीचा सेल्फी कॅमेरा मिळतो. याला पावर देण्यासाठी ५४०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -