Sunday, December 15, 2024
Homeताज्या घडामोडीHealth: दररोज दही खाणे फायदेशीर आहे का? घ्या जाणून

Health: दररोज दही खाणे फायदेशीर आहे का? घ्या जाणून

मुंबई: जर तुमचे आरोग्य निरोगी आहे आणि तुम्ही मर्यादित प्रमाणात दही खात आहात याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. अशातच जर तुम्ही रात्रीच्या वेळेस दही खात असाल तर यामुळे कफ बनत असेल तर डॉक्टर हे खाण्यासाठी मनाई करू शकतात. अशातच दररोज दही खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया…

दह्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरलेले आहेत. अनेकजण दही आवडीने खातात. दही खाल्ल्याने अनेक पोषकतत्वे शरीरास मिळतात. मात्र रोज रोज दही खाणे योग्य आहे का? की यामुळे काही नुकसानही होऊ शकते.

शरीरातील सेल्स वाढवण्यासाठी अमिनो अॅसिडची आवश्यकता असते जे प्रोटीनमधून मिळते. मसल्स, त्वचा, केस, नखे हे सर्व प्रोटीनपासून बनलेले असते. अशातच दररोज शरीराला प्रोटीन देण्यासाठी दही हे चांगले माध्यम आहे. १०० ग्रॅम दही खाल्ल्यास ११.१ ग्रॅम प्रोटीनची पूर्तता होते.

आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे जेवण पचवण्यासाठी मदत करतात. यांची संख्या कायम राखण्यासाठी दही फायदेशीर ठरते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ब्लोटिंग, गॅस, पोटात जळजळसारख्या समस्या दूर होतात.

आपल्या शरीरातील हाडांसाठी कॅल्शियम अतिशय गरजेचे असते. याच्या कमतरतेमुळे हाडे कमी आणि कमकुवत होऊ लागतात. अशातच दही खाऊन तुम्ही शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता. दह्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आढळते.

शरीरातील नसांसाठी, मेंदू आणि रक्तासाठी व्हिटामिन बी १२ची गरज असते. हे व्हिटामिन फार कमी पदार्थांमध्ये आढळते. दरम्यान, दही हे दुधापासून बनवलेले असेल तर व्हिटामिन बी १२ मिळते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -