Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वReliance Jio : जिओचा दिवाळी-धमाका! ६९९ रुपयांत मिळेल ‘जिओभारत’ ४जी फोन

Reliance Jio : जिओचा दिवाळी-धमाका! ६९९ रुपयांत मिळेल ‘जिओभारत’ ४जी फोन

मुंबई: देशभरात दिवाळीच सण एका दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच अधिकतर कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध ऑफर्स देत आहेत. यातच रिलायन्स जिओचे (Reliance Jio) मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनीही जबरदस्त दिवाळी ऑफर सादर केली आहे. यामुळे लोक आता जिओचा फोन ७०० रूपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

जिओची दिवाळी ऑफर

दिवाळीला रिलायन्स जिओ जिओभारत फोनवर ३० टक्क्यांची सूट देत आहे. यानंतर आता ९९९ रूपयांना मिळणार जिओभारत फोन केवळ ६९९ रूपयांना खरेदी केला जाऊ शकतो. सोबतच जिओ भारत फोनला १२३ रूपयांमध्येही रिचार्ज करता येते. या रिचार्जमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलसोबत १४ जीबी डेटाही मिळतो. हा महिन्याचा रिचार्ज प्लान आहे.

रिलायन्स जिओचा १२३ रूपयांचा रिचार्ज प्लान एअरटेल आणि वोडाफोनच्या रिचार्ज प्लान्सच्या तुलनेत साधारण ४० टक्के स्वस्त आहे. तर रिलायन्स जिओच्या या फोनसोबत तुम्ही २ जी ते ४जीमध्ये शिफ्ट होण्याची संधी मिळते.

फोनमध्ये जबरदस्त फीचर्स

फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये ४५५ पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहायला मिळतात. सोबतच या फोनमध्ये मूव्ही प्रीमियर आणि नवे सिनेमे, व्हिडिओ शो, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, डिजीटल पेमेंटसारखे फीचर्स मिळतात. सोबतच फोनमध्ये क्यूआर कोड स्कॅन करण्याचीही सुविधा मिळते. इतकंच नव्हे हा फोन जिओ पे आणि जिओ चॅटसारख्या प्रीलोडेड अॅप्सनाही सपोर्ट करतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -