नागपूर : मध्य व दक्षिण भारतातील प्रमुख कनेक्टिव्हिटीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सेवा १५ सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे. १३० किमी प्रति तास गतीने धावणारी ही १६ डब्यांची अत्याधुनिक ट्रेन नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावेल.
नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस पाच प्रमुख स्थानकांवर थांबेल, ज्यामध्ये चंद्रपूर जिल्हा समाविष्ट आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर स्थानकावरून प्रवाशांना विशेष सुविधा मिळतील. या सेवेची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्याची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली आहे.
यापूर्वी जानेवारी २०२३ मध्ये या ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. आता दररोज धावणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार, ट्रेन नागपूर येथून सकाळी ५:०० वाजता सुटेल.
सेवाग्राम: ५:५०, चंद्रपूर: ७:२०, बल्लारपूर: ७:४०,
रामगुडंम, ९:१०, काजीपेठ: १०:०६, सिकंदराबाद: १२:१५ वाजतो पोहचेल.
सिकंदराबादहून परतीचा प्रवास रात्री १:०० वाजता सुरू होईल आणि ट्रेन सकाळी ८:२० वाजता नागपूरला पोहोचेल.
या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसने पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी प्रवास अधिक आरामदायक आणि जलद होईल. विशेषतः चंद्रपूरसह इतर स्थानकांवरील थांब्यामुळे स्थानिक प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, असे नमो रेल्वे वेलफेयर पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे यांनी म्हटले आहे.