शिक्षकांना परत पाठवणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार
भंडारा : आवडत्या शिक्षकासाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. भंडारा शहराच्या शेजारी असलेल्या गणेशपुर ग्रामपंचायत मधील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलला कुलूप ठोकून शाळकरी विद्यार्थी, पालक, जिल्हा परिषद सदस्य आणि गावकरी मिळून ठिय्या आंदोलन सुरू केलेले आहे. जोपर्यंत बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना परत पाठवणार नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार असल्याचा यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
शून्य पटसंख्या असलेल्या या शाळेला गावकऱ्यांनी आणि जिल्हा परिषद चे शिक्षक चौधरी सर आणि घर सर यांनी मिळून नव्याने सुरू केली. आज या शाळेची पटसंख्या 110 वर पोहोचली आहे. शिक्षणाचा दर्जाही वाढल्याने बऱ्याच पालकांनी इंग्रजी शाळेतून मुलांचा प्रवेश या शाळेत करून घेतला. मात्र या शाळेतील शिक्षक चौधरी सर आणि घरत सर यांना पदोन्नती देऊन त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना पदोन्नती देण्यास हरकत नाही ती पदोन्नती या शाळेत रिक्त असलेल्या जागेवर द्या अशी मागणी पालकांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत शासनाने त्यांची बदली इतर ठिकाणी केल्याने पालक विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी मिळून शाळेला कुलूप ठोकले आहे आणि जोपर्यंत चौधरी सर आणि घरत सर परत या शाळेत येणार नाही तोपर्यंत ही शाळा सुरू होणार नाही आणि आम्ही असंच आंदोलन करून असं यावेळी आंदोलन कर्त्यानी सांगितले.