मुंबई: टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा दिला आहे. कंपनीने युजर्सना +92 नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहण्यास सांगितले आहे. देशात सातत्याने वाढत्या घोटाळ्यादरम्यान कंपनीने लोकांना सतर्क केले आहे की अशा कॉल्सपासून सावध राहा नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.
काय दिलाय इशारा
कंपनीने युजर्सला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, +92 अथवा अन्य स्त्रोतांकडून पोलीस अधिकारी बनून आलेले कॉल्स अथवा मेसेजेसपासून सावध राहा. सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यासाठी १९३०वर कॉल करा अथवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. येथे गुन्हेगार स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करतात. या पद्धतीने ते धोका देण्याचा प्रयत्न करतात.
फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय
जर तुम्हाला कुठून कॉल येत असेल आणि ती व्यक्ती स्वत:ला पोलीस अधिकारी सांगत असेल तर त्या अधिकाऱ्याचा बॅज नंबर, विभागाचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मागा. यानंतर या माहितीची फेरतपासणी करा.
याशिवाय तुमचे सामाजिक सुरक्षा नंबर, बँक खात्याची माहिती अथवा क्रेडिट कार्ड विवरण सारखी माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका.
जर तुम्हाला एखाद्या कॉलबद्दल संशय असेल तर कॉल कट करा अथवा सरळ पोलीस विभागाशी संपर्क करा.