मुंबई: नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्यातील घटस्फोट चांगलाच गाजला होता. दीर्घकाळ सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती. अखेर १८ जुलैला या जोडप्याने एक स्टेटमेंट जारी करत आपला घटस्फोट कन्फर्म केला.
हार्दिक पांड्यापासून वेगळी झाल्यानंतर नताशा मुलगा अग्स्त्यला घेऊन आपल्या माहेरी सर्बियाला गेली होती. तिने मुलाचा वाढदिवसही तेथेच साजरा केला होता. आता घटस्फोटानंतर मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक भारतात परतली आहे.
भारतात येताच तिने सर्वात आधी आपला मुलगा अगस्त्यला हार्दिकच्या घरी सोडले. हार्दिक पांड्याची वहिनी आणि अगस्त्याची काकी पंखुडी पांड्याने सोशल मीडियावर अगस्त्यसोबतचा व्हिडिओ शेअर केला होता. यात ती अगस्त्यला आपल्या मांडीवर घेऊन गोष्ट ऐकवत होती. पंखुडीच्या मांडीवर अगस्त्य आणि तिचा मुलगा दिसत आहे.
गेल्या वर्षी गाजावाजा करत केले होते लग्न
नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्याने २०२०मध्ये लग्न केले होते. हे जोडपे एका सिंपल फंक्शनमध्ये एकमेकांचे झाले होते. गेल्याच वर्षी पांड्या आणि नताशाने अतिशय धामधुमीत लग्न केले होते. जुलैमध्ये वेगळे झाल्यानंतर जोडप्यांनी भले वेगळे होत असल्याचे सांगितले. मात्र ते आपल्या मुलाची काळजी एकत्र घेणार असल्याचे सांगितले होते.