मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरला खेळवला जाईल. हा सामना चेन्नईत आयोजित करण्यात येईल. भारत-बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी लवकरच संघाची घोषणा केली जाऊ शकते. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानावर उतरणार आहे.
टीम इंडिया या मालिकेत अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकते. मात्र त्यांची निवड त्यांच्या फॉर्मवर अवलंबून आहे. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळू शकते.
यशस्वी जायसवाल चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे यशस्वी आणि शुभमन गिल यांची जागा साधारण निश्चित आहे. जर शुभमन गिलने दिलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याच्यासाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनाही टीम इंडियात संधी मिळू शकते. सर्फराज आणि जुरेल यांनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. जडेजा अनुभवी ऑलराऊंडर आहे.
टीम इंडिया स्पिनर्सवर विशेष लक्ष देऊ शकतात. कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनाही संधी मिळू शकते. भारतीय संघ अर्शदीप सिंहच्या नावावरही विचार करू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे लक्ष खेळाडूंच्या दिलीप ट्रॉफीमधील प्रदर्शनावरही असणार आहे. विकेटकीपर ऋषभ पंतचे स्थान निश्चित आहे.
बांगलादेशविरुद् भारताचा संभाव्य संघ – रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, अर्शदीप सिंह.