मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी माजी भारतीय विकेटकीपर अजय रात्रा यांना पाच सदस्यीय पॅनेलमध्ये सलिल ला यांच्या जागी पुरुष क्रिकेट संघाच्या निवडकर्तापदी नियुक्त केले आहे. परंपरेनुसार पाच निवडकर्ते विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
गेल्या वर्षी आगरकर यांची मुख्य निवड समितीचे प्रमुख म्हणून निवड केल्यानंतर निवड समितीमध्ये पश्चिम भागातून दोन निवडकर्ते सामील झाले. यात अंकोला आधीपासूनच या समितीचा भाग होते. यामुळे निवड पॅनेलच्या आत क्षेत्रीत प्रतिनिधित्व संतुलन कायम राखण्यासाठी एखाद्या सदस्याला बाहेर जाणे ठरलेलेच होते आणि बीसीसीआयने सलील अंकोला यांना निवड समितीतून हटवण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी पीटीआयला सांगितले, हा एक मोठा सन्मानही आहे आणि आव्हानही आहे. मी भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्यास उत्सुक आहे. भारताला १९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. दरम्यन अजर रात्रा ५ सप्टेंबरपासून पदभार सांभाळतील. ४२ वर्षीय रात्रा यांनी भारतासाठी ६ कसोटी, १२ वनडे सामने खेळले आहेत.