Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीSudhir Mungantiwar : लंडनमधील ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच!

Sudhir Mungantiwar : लंडनमधील ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच!

वाघनखांवरील विरोधकांच्या आरोपांना मुनगंटीवारांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : लंडन (London) येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे (Waghnakhe) लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. परंतु या वाघनखांबाबत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांसह अनेक विरोधकांनी ही वाघनखे शिवरायांची नसल्याचा दावा केला होता. तसेच राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात होता. मात्र या सगळ्या आरोपांवर मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantiwar) चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आज विधानसभेत झालेल्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच असल्याचे स्पष्ट केले. पुढील आठवड्यात ही वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत जाहीर केले. त्यासोबत ही वाघनखे भारतात आणण्यासाठी किती रुपयांचा खर्च होणार, यासंदर्भातील माहिती देखील त्यांनी सांगितली आहे.

वाघनखे ठेवण्यासाठी ७ कोटींचा खर्च ?

महाराष्ट्रात वाघनखे आणण्यासाठी तब्बल ७ कोटींचा खर्च झाला असल्याची चर्चा पसरत आहे. मात्र ही खोटी माहिती असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. लंडनहून वाघनखे आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे दिले नसून त्यामध्ये केवळ १४ लाख ८ हजारांचा खर्च झाला आहे. या वाघनखांसोबत छत्रपती शिवरायांच्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे व त्यासाठी लागणाऱ्या म्युझियमच्या डागडुजीसाठी आणि नुतनीकरणासाठी हे पैसे खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, १९ जुलैला हे वाघनखे साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व तिथले सरदार यांच्या उपस्थितीत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -