Sunday, July 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNarayan Rane : कोण वडेट्टीवार? त्यांना आमदार आधी मी बनवलं!

Narayan Rane : कोण वडेट्टीवार? त्यांना आमदार आधी मी बनवलं!

खासदार नारायण राणे यांचं वक्तव्य 

मुंबई : सध्या राज्यभरात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा जोर धरत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा शांतता मोर्चाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळण्याविषयी मागणी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे. यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे व यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधक राज्य सरकारवर याबाबत टीका करत आहे. सत्तेत असूनही आरक्षण देऊ शकत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सरकारवर केला. यावर लोकसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी वडेट्टीवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.

खासदार नारायण राणे म्हणाले, वडेट्टीवार कोण आहेत? विरोधी पक्षनेते ना? त्यांना विषय कळत नाही. गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार आधी मी बनवलं. आता तो विरोधी पक्षनेता आहे. त्याच्यामुळे कशाने काय करता येतं? याचा त्याने अभ्यास करावा आणि मग बोलावं, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -