Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai News : पाणीसाठा वाढल्याने मुंबईकर चिंतामुक्त!

Mumbai News : पाणीसाठा वाढल्याने मुंबईकर चिंतामुक्त!

मुसळधार पावसामुळे एकाच दिवसात चार टक्क्यांनी वाढ

पाणीकपात रद्द करण्याची मुंबईकरांची मागणी

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या पाणीसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी एका दिवसात ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांतील पाणीसाठा सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत १८ टक्क्यांवर पोहोचला. मागील वर्षीपेक्षा उपलब्ध पाणीसाठा हा ३ टक्क्यांनी कमी असला तरी मुंबईकरांसाठी ही समाधानकारक बाब आहे. मागील वर्षी ८ जुलैला मुंबईचा उपलब्ध पाणीसाठा २१.५७ टक्के इतका होता. पुरेशा पाणीसाठ्यामुळे मुंबईकरांची सप्टेंबरपर्यंतची पाणी चिंता
मिटली आहे.

मुंबईचा जलसाठा पोहोचला १८ टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ८ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना मुंबई आणि परिसरात पालिकेकडून पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ही पाणीकपात ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के इतकी करण्यात आली होती. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. मुंबईचा जलसाठा १८ टक्क्यांवर आल्यावर पालिका पाणीकपातीचा निर्णय मागे घेणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून आहे.

अतिरिक्त साठ्याचा वापर थांबविला

  • राज्य सरकारकडून भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळतो. मुंबईच्या पाणीसाठ्यात घट झाल्यानंतरच या अतिरिक्त साठ्याचा वापर पालिका प्रशासनाकडून केला जातो. मात्र, मागील काही दिवसांतील जलाशय क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीसाठ्यात वाढ झाली. या पार्श्वभूमीवर हा अतिरिक्त साठ्याचा वापर पालिकेकडून थांबविण्यात आला आहे.
  • १८% टक्क्यांवर सात जलाशयांतील पाणीसाठा सोमवारी सकाळी पोहोचला. समाधानकारक पाऊस होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा
    झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -