गांधीनगर : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामुळे जनतेची व राजकीय नेत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक फेरीगणिक नेमकं काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच गांधीनगरमधून अमित शाह यांनी १ लाख ५५ हजार मतांनी आघाडी मिळवत मोठी झेप घेतली आहे.
वाराणसीमधून नरेंद्र मोदी सुरुवातीला ४ हजार मतांनी पिछाडीवर गेल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र त्यांनी देखील आता ९ हजार मतांनी आघाडी राखली आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे उज्जल निकम हे ११ हजार मतांनी पुढे आहेत. तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या पिछाडीवर आहेत.